जगावर येणार मोठं संकट, त्या माशानं दोन ठिकाणी दिले संकेत; ती भयंकर भविष्यवाणी खरी ठरणार?
2025 मध्ये अशा अनेक घडामोडी घडत आहेत, ज्यामुळे संपूर्ण जग हादरून गेलं आहे. जून महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत असे अनेक अपघात घडले ज्यामुळे काहीतरी मोठं घडणार असल्याची भीती आता लोकांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे.

2025 मध्ये अशा अनेक घडामोडी घडत आहेत, ज्यामुळे संपूर्ण जग हादरून गेलं आहे. जून महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत असे अनेक अपघात घडले ज्यामुळे काहीतरी मोठं घडणार असल्याची भीती आता लोकांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. नुकतंच अहमदाबादमध्ये विमान कोसळल्याची घटना घडली, या अपघातामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला, त्यानंतर केदारनाथ इथे हेलिकॉप्टर कोसळले, या अपघातामध्ये देखील सात जणांचा मृत्यू झाला. इराण इस्रायल युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये देखील आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान जगात काही तरी प्रलयकारी घटना घडणार आहे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असतानाच ऑस्ट्रेलिया आणि भारतात काही दिवसांपूर्वी सापडलेल्या एका माशामुळे ही भीती आणखी गडद झाली आहे. या माशाबद्दल अनेक समज, गैरसमज प्रचलित आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच तामिळनाडूच्या समुद्रात मासेमारी करत असताना मच्छिमारांच्या जाळ्यात एक मासा अडकला, ज्याचं नाव ओरफिश आहे, त्याला रिबनफिश नावानं देखील ओळखलं जातं. भारतासोबतच ऑस्ट्रेलियाच्या तस्मानियामध्ये देखील समुद्रात हा मासा आढळून आला आहे. या माशाला विध्वंसाचा संकेत मानलं जातं. जेव्हा हा मासा दिसतो तेव्हा काहीतरी मोठ्या घटना घडतात अशी या माशाबाबत मान्यता आहे.
ओरफिश ही माशाची अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे, तो दिसायलाही खूप विचित्र दिसतो. लोकांमध्ये या माशाबाबत अनेक अंधश्रद्धा आणि समज आहेत. या प्रजातीच्या पूर्ण वाढ झालेल्या माशाची लांबी ही तब्बल 30 फुटांपर्यंत असू शकते. हा मासा खोल समुद्रात राहातो. तो कधीच वर येत नाही. मात्र असं मानलं जातं की त्याला जेव्हा समुद्राच्या तळाला भुकंपाचे धक्के जाणवतात, तेव्हा तो समुद्राच्या वर येतो. त्यामुळे आता या माशाबाबत लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. हा मासा समुद्राच्या वर येणं हे त्सुनामीचे संकेत मानले गेले आहेत. सोबतच जपानी बाबा वेंगाने देखील मोठी भविष्यवाणी केली आहे, 5 जुलै रोजी जपानमध्ये मोठा भूकंप होणार असल्याचं भाकीत त्यांनी केलं आहे. तसेच बाबा वेंगा यांनी देखील 2025 हे वर्ष जगाच्या अंताची सुरुवात असेल असं भाकीत केलं होतं.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
