AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं पाऊल, थेट…, वेगवान घडामोडी

धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आज आपल्या शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शिक्षण खात्याचा राजीनामा देताचा त्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं पाऊल, थेट..., वेगवान घडामोडी
dharmendra pradhanImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 25, 2026 | 5:52 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपर लीक प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देशभरातून होत होती. त्यासाठी गेल्या महिनाभरापासून कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीमधील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं. सोनम वांगचूक यांनी देखील शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण केलं. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने संसदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यामुळे वातावरण आणखी तापलं. शुक्रवारी सीजेपी आणि सरकार यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत सीजेपीच्या सिष्टमंडळाने सरकारसमोर तीन मोठ्या मागण्या ठेवल्या होत्या.

पहिली मागणी म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, वीस जुलैच्या आंदोलनामध्ये जे विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होऊ नये आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी, त्यानतंर सरकारने सीजेपीच्या शिष्टमंडळाकडे वेळ मागितला होता. अखेर आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा सिजेपीचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये बैठक झाली, या बैठकीत तीनही मागण्या पूर्ण झाल्याची माहिती शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आता आपली ट्विटर प्रोफाईल बदलली आहे. पूर्वी त्यांच्या ट्विटर प्रोफाईलवर शिक्षण मंत्री असल्याचा उल्लेख होता. मात्र आता त्यांनी ती माहिती हटवली आहे, आता त्यांच्या ट्विटर प्रोफाईलवर ते खासदार आहेत, फक्त एवढीच माहिती ठेवण्यात आली आहे.  या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे.  धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिय येण्यास सुरुवात झाली आहे.

हा देशातील युवा शक्तीचा विजय असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील तरुणांचं आणि आंदोलकांचं अभिनंदन केलं आहे.

Follow Us
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच