मोठी बातमी! अभिजीत दिपकेसह CJP च्या सर्व सदस्यांना होणार अटक? कुणाचा दावा, कुणाचे इनपूट, एकच खळबळ

CJP Protest Abhijeet Dipke: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कॉक्रोच जनता पार्टी ठाम आहे. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी इरादा स्पष्ट केला. त्याचवेळी अभिजीत दिपके यांच्यासह इतर सदस्यांची सरकार आजच धरपकड करणार असल्याचा दावा समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! अभिजीत दिपकेसह CJP च्या सर्व सदस्यांना होणार अटक? कुणाचा दावा, कुणाचे इनपूट, एकच खळबळ
अभिजीत दिपकेंसह सीजेपी सदस्यांना अटक?
| Updated on: Jul 24, 2026 | 12:49 PM

CJP Protest Abhijeet Dipke: दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. आज सरकारसोबत कॉक्रोच जनता पार्टीची चर्चेची पहिली फेरी आहे. त्यापूर्वीच एक मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. सीजेपीच्या सर्व सदस्यांना अटक होण्याचा दावा संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी केला आहे. दुपारी केंद्र सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सीजेपी ठाम आहे. पक्षाने तशी भूमिकाही जाहीर केली आहे. त्यामुळे सरकारसोबतची चर्चा फिसकटण्याची दाट शक्यता आहे. आज संध्याकाळी आपल्यासह सदस्य आणि समर्थकांना अटक होण्याचा दावा अभिजीत दिपके यांनी केला. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.

काय मिळाले दिपकेंना इनपूट?

मला आताच इनपूट मिळाले आहे की, आज संध्याकाळी अथवा रात्री मला आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या टीमला अटक केली जाऊ शकते. माझा सरकारला सवाल आहे की आम्हाला अटक का करायची आहे? आम्ही तर गेल्या 35 दिवसांपासून शांततापूर्ण मार्गाने जंतरमंतरवर आंदोलन करत आहोत. मला नाही वाटत की स्वतंत्र भारतात इतके शांततापूर्ण आंदोलन झाले. आम्ही महात्मा गांधी यांच्या मार्गावर चालणारी लोक आहोत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर आम्ही चालत आहोत. आम्ही राज्य घटनेच्या मार्गावर चालत आहोत. तुम्हाला आमच्यापासून काय अडचण आहे? आम्हाला अटक का करायची आहे? असा रोकडा सवाल अभिजीत दिपके यांनी सरकारला विचारला आहे.

तुम्ही अटक करण्याची चूक करू नका

यावेळी अभिजीत दिपके यांनी सरकारला कडक इशाराही दिला. मी इतकेच सांगू इच्छितो की, तुम्ही आम्हाला अटक करण्याची चूक करू नका. तुम्ही सोनम वांगचुक यांना येथून हटवून आंदोलन अजून मोठे केले. आता पुन्हा तशीच दुसरी चूक करणार आहात. ज्या लहान लहान मुलींचे डोके फोडले. ज्या पुरूष पोलीस अधिकाऱ्यांनी मुलींचे कपडे फाडले. त्यांना मारले. त्यानंतरच आंदोलनाचे लोण देशभरात पोहचले. त्यामुळे आम्हाला अटक करण्याची चूक अजिबात करू नका. नाहीतर हे आंदोलन अजून मोठे होईल.

पुढची योजना काय?

मी सर्वांना विनंती करतो की, जर कॉक्रोच जनता पार्टीच्या टीमला रात्री अटक करण्यात आली तर, हे आंदोलन शांततेच्या मार्गाने पुढे न्या. ही आता तुमची जबाबदारी आहे. मला तुम्हा सर्वांवर विश्वास आहे. तुम्ही कायद्याला मानणारे लोक आहात. तुम्ही कोणतीही चुकीची गोष्ट करणार नाही, ज्याने देशाला नुकसान होईल, असे आवाहन दिपके यांनी समर्थाकांना केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us