AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिंता करू नका! 94000 मेट्रिक टन LPG घेऊन 2 जहाजे भारताकडे रवाना, मोठा दिलासा

भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने बंदरे, आणि जलमार्ग मंत्रालयाचा हवाला देत सांगितले की, सुमारे 94,000 मेट्रिक टन एलपीजी वाहून नेणारी दोन जहाजे भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत.

चिंता करू नका! 94000 मेट्रिक टन LPG घेऊन 2 जहाजे भारताकडे रवाना, मोठा दिलासा
India lpg ShipImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 29, 2026 | 9:56 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातीय युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने जहाजांची वाहतूक प्रभावित झाली आहे. त्यामुळे भारताकडे येणार्‍या LPG च्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. अशातच आता भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने रविवारी बंदरे, आणि जलमार्ग मंत्रालयाचा हवाला देत सांगितले की सुमारे 94,000 मेट्रिक टन एलपीजी वाहून नेणारी दोन जहाजे, BW TYR आणि BW ELM होर्मुज सामुद्रधुनी पार करून भारताच्या किनाऱ्याकडे येत आहेत. यातील एक जहाज 31 मार्च रोजी मुंबईत आणि दुसरे जहाज 1 एप्रिल रोजी न्यू मंगळुरूमध्ये पोहचण्याची अपेक्षा आहे.

या दोन्ही जहाजांबाबत बोलताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले की,’ भारतीय जहाजे आणि नाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.’ मंत्रालयाकडून निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की देशातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. युरिया प्रकल्पांना होणारी पुरवठा मागील 6 महिन्यांच्या सरासरीच्या 70-75 टक्क्यांवर स्थिर आहे, तर पुरवठा टिकवण्यासाठी अतिरिक्त एलएनजी आणि आरएलएनजीची व्यवस्था केली जात आहे अशीही माहिती देण्यात आली आहे.

एलपीजी वाहून आणणाऱ्या जहाजांवर लक्ष

सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग (DG Shipping) जहाजमालक, RPSL एजन्सी आणि भारतीय दूतावासांसह परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बंदरे आणि जलमार्ग मंत्रालयानुसार, DG Shipping चा कंट्रोल रूम 24×7 कार्यरत आहे आणि सुरू झाल्यापासून आतापर्यंत 4523 कॉल आणि 8985 ईमेलची तपासणी करण्यात आली आहे. शनिवारी गुजरातमधील जामनगर येथे डीपीए कांडला अंतर्गत वडिनार टर्मिनलवर 47,000 मेट्रिक टन एलपीजीचा साठा पोहोचला आहे, त्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. तसेच भारतीय नौदलाच्या युद्धनौका व्यापारी जहाजांना मदत करण्यासाठी सज्ज आहेत. अशाही माहिती देण्यात आली आहे.

होर्मुज संकटात भारताला दिलासा

मंत्रालयाअंतर्गत झालेल्या बैठकीत बंदरे आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितले की, अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून विविध संस्थांशी समन्वय साधत आहेत. भारताने होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षित आणि अखंड समुद्री वाहतूक कायम ठेवण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच पश्चिम आशियातील बिघडत्या सुरक्षेच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्यातीही भाषा केली आहे. देशाच्या ऊर्जा हितांचे रक्षण करण्यासाठी या प्रदेशातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सरकारकडून अनेकदा स्पष्ट करण्यात आले आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात