AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder Price : 1 एप्रिलपासून गॅस सिलेंडर महाग? इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धाने वाढवले टेन्शन

LPG Cylinder price from 1st April: देशात इंधन आणि मुबलक गॅस सिलेंडर साठा असल्याचा दावा सरकारने केला आहे. पुढील 60 दिवस पुरेल इतका इंधन साठा असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. तरीही युद्ध अजून काही महिने लांबण्याची भीती व्यक्त होत आहे. 1 एप्रिलापासून खरंच गॅस सिलेंडरच्या किंमती वाढणार का?

LPG Cylinder Price : 1 एप्रिलपासून गॅस सिलेंडर महाग? इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धाने वाढवले टेन्शन
एलपीजी सिलेंडर महाग होणार?Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 29, 2026 | 1:22 PM
Share

LPG Cylinder price from 1st April: इराण-इस्त्रायल आणि अमेरिका युद्ध अजून काही महिने लांबण्याची शक्यता आहे. अमेरिकेन सैनिक आखातात उतरले आहेत. तर देशात पुढील दोन महिने पुरेल इतका इंधन आणि गॅस साठा असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी देशात लॉकडाऊन लागण्याच्या चर्चा फेटाळल्या आहेत. सरकारपुढे असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण युद्ध लांबल्यास 1 एप्रिलापासून खरंच गॅस सिलेंडरच्या किंमती वाढणार का? याची काळजी नागरिकांना लागली आहे.

संकटाशी दोन हात

केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, सध्याची जागतिक स्थिती पाहता देशात इंधन अथवा इतर अत्यावश्यक वस्तूंची कोणतीही कमी नाही. मंत्रालयानुसार, भारताकडे तेल आणि गॅसचा मुबलक साठा आहे. पुढील 60 दिवसांची तयारी अगोदरच पूर्ण करण्यात आली आहे. याशिवाय भारत आता 41 हून अधिक देशांकडून कच्चे तेलाची आयात करत आहे. त्यात होमूर्ज स्ट्रेटचा कोणताही अडथळा नाही. पण तरीही गॅस एजन्सीसमोरील रांगा कमी झालेल्या नाहीत. तर अनेक पेट्रोल पंप बंद पडले आहेत. जिथे पेट्रोल-डिझेल उपलब्ध आहेत, त्या पेट्रोल पंपावर गर्दी झाली आहे.

LPG सिलेंडर महाग होणार?

सध्या इराण-इस्त्रायल आणि अमेरिकेतील तणाव निवळण्याची चिन्हं कमी आहेत. आखातातील तणावाचा परिणाम पेट्रोल-डिझेलसह नैसर्गिक गॅसवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 एप्रिल, 2026 रोजी एलपीजी गॅस ग्राहकांना झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात केंद्र सरकारकडून याविषयीचे कोणतेही अधिकृत वृत्त, वक्तव्य आलेले नाही. तेल वितरण कंपन्या (OMCs) प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅसच्या किंमतींची समीक्षा करते. मध्यपूर्वेतील तणाव आणि तेल संकटादरम्यान कच्चे तेल आणि गॅस किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या एक तारखेला ग्राहक खरंच एप्रिल फुल होतात की खिशाला झळ बसते हे समोर येईल.

मार्च 2026 रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ झाली. आता गॅस सिलेंडरच्या किंमती 853 च्या जवळपास आहे. प्रत्येक शहरानुसार या किंमतीत आणि कर्मचारी वाहतूक खर्च जोडत असल्याने फरक जाणवतो. व्यावसायिक गॅसच्या किंमतीही वधारल्या आहेत. तर त्यांचा मोठा तुटवडाही समोर आला आहे. इराण युद्धामुळे  LPG सोबतच CNG आणि PNG च्या किंमतीत 1 एप्रिलपासून मोठ्या बदलाची शक्यता आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात