AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump: व्हेनेझुएला, इराणनंतर आता हा देश टार्गेटवर, थेट हल्ला, ट्रम्प यांची धमकी काय?

Donald Trump attack on Cuba: ट्रम्प यांच्या युद्धखोरीला लगाम घाला अशी मागणी अमेरिकन जनता करत आहे. त्यासाठी अमेरिकेत आंदोलन सुरू आहे. त्याचवेळी ट्रम्प यांनी आता या देशावर हल्ला करण्याची धमकी देऊन जगात एकच खळबळ उडवून दिली आहे.

Donald Trump: व्हेनेझुएला, इराणनंतर आता हा देश टार्गेटवर, थेट हल्ला, ट्रम्प यांची धमकी काय?
डोनाल्ड ट्रम्प, क्यूबाImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 29, 2026 | 12:42 PM
Share

Donald Trump attack on Cuba: व्हेनेझुएलानंतर इराण आणि त्यानंतर आता जगात या देशावर अमेरिका हल्ला करणार आहे. युद्ध नको म्हणून अमेरिकन जनता रस्त्यावर उतरलेली असतानचा डोनाल्ड ट्रम्प यांनी क्यूबा या देशावर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या एका वर्षात ट्रम्प यांनी क्यूबावर हल्ला करण्याच्या 10 धमक्या दिल्या आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा धमकी दिली आहे. तर क्युबा अशा धमक्यांना भीक घालत नसल्याचे आणि चोख प्रत्युत्तर देण्याचा कडक इशारा क्युबाचे राष्ट्रपती मिगेल डियाज-कॅनल यांनी दिली आहे. इराण युद्ध संपताच अथवा अखेरच्या टप्प्यात अमेरिका क्यूबावर हल्ला करण्याची भीती व्यक्त होत आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कॅरेबियन क्षेत्रासाठी संघर्षाची घेऊन आली. कारण या वर्षाच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांच्या आदेशानंतर व्हेनेझुएलावर हल्ला चढवून तिथल्या राष्ट्रपतींना पत्नीसह अटक करण्यात आली. त्यांच्यावर अमेरिकेत खटला सुरू आहे. राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सध्या अमेरिकन तुरूंगात आहेत. या घटनेने जगात एकच खळबळ उडवून दिली. तर त्याचवेळी क्यूबावर सुद्धा अमेरिका हल्ला करण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.

क्यूबा आता पुढील टार्गेट

व्हेनेझुएला नंतर क्यूबा या देशावर युद्धाचे ढग गडद झाले आहेत. ट्रम्प यांच्या वारंवार धमकीमुळे क्यूबातील लष्करी हालचाली वाढल्या आहेत. व्हेनेझुएलानंतर लागलीच क्यूबाचा क्रमांक लागण्याची भीती होती. तर क्यूबाच्या राष्ट्रपतींनीही देशाची अखंडतेच्या संरक्षणासाठी अमेरिकेला तोडीस तोड उत्तर देणार असल्याचे म्हटले होते. क्यूबा सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. व्हेनेझुएलाकडून इंधन आयात जवळपास ठप्प झाली आहे. इंधनचा कमतरतेमुळे क्यूबावर ऊर्जा संकट कोसळले आहे.

67 वर्षांचे वितुष्ट

अमेरिका आणि क्युबामध्ये 67 वर्षांपासून शत्रूत्व आहे. 1959 मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी क्यूबामध्ये क्रांती घडवून सत्ता हस्तगत केली होती. त्यांनी अमेरिकन कंपन्या आणि कारखाने ताब्यात घेतले. हा कम्युनिस्ट विचारसरणीचा देश आहे. भांडवलशाहीला कॅस्ट्रो यांचा विरोध होता. कॅस्ट्रो यांना मारण्याचे अनेक प्रयत्न अमेरिकेने केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. रशिया हा कायम क्यूबाच्या पाठीशी उभा ठाकला. आता अमेरिका पुन्हा क्यूबावर हल्ला करण्याची धमकी देण्यात येत आहे.

Follow Us
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा