AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, नाराज असलेल्या बड्या नेत्याचा अखेर राजीनामा, थेट ट्विटवर पोस्ट केलं राजीनामा पत्र

भाजपला मोठा धक्का बसला आहे, बड्या नेत्यानं पक्षाचा राजीनामा दिला आहे, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना पत्र लिहून त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. तसेच माझा राजीनामा स्वीकार करावा अशी विनंती देखील केली आहे.

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, नाराज असलेल्या बड्या नेत्याचा अखेर राजीनामा, थेट ट्विटवर पोस्ट केलं राजीनामा पत्र
भाजपच्या बड्या नेत्याचा राजीनामा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 17, 2026 | 12:03 PM
Share

मोठी बातमी समोर येत अखेर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी अखेर पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच प्रवक्तेपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना एक पत्र लिहून आपण पक्ष सोडत असल्याची माहिती दिली आहे. तसेच माझा राजीनामा स्वीकार करावा अशी विनंती देखील त्यांनी यावेळी नितीन नबीन यांना केली आहे. शहजाद पूनावाला हे भाजप सोडणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र त्यांनी अधिकृतरित्या पक्षाचा राजीनामा दिला नव्हता, परंतु आता त्यांनी अधिकृतरित्या आपण भाजप सोडत असल्याची घोषणा केली आहे. मी जरी पक्ष सोडणार असलो तरी पक्षाची विचारधारा सोडणार नसल्याचं त्यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.

शहजाद पूनावाला यांनी सोमवारी ट्विटरवर आपलं राजीनामा पत्र पोस्ट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या 30 जुलै 2026 च्या एका पत्राचा संदर्भ दिला आहे. त्या पत्रात मी माझ्या वैयक्तिक आणि आर्थिक कारणांमुळे पक्षाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती, परंतु पक्षाने माझा राजीनामा स्वीकारला नाही, मला विचार करण्यासाठी वेळ दिला, हा माझ्यासाठी अत्यंत भावुक करणारा क्षण होता, असं या पत्रामध्ये पूनावाला यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पूनावाला यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटलं आहे की, परंतु मी आता खूप विचार केला आहे. मी आता निर्णय घेतला आहे. मी भाजपच्या सदस्यत्वाचा तसेच प्रवक्तेपदाचा राजीनामा देत आहे. मी जरी पक्ष सोडत असलो तरी पक्षाची विचारधारा कधीही सोडणार नाही, कृपया माझा राजीनामा स्वीकार करावा. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही घटना घडल्या, ज्या व्यक्तींबद्दल तुम्हाला मी सविस्तर सांगितले आहे, त्यांनीच मला माझ्या निर्णयावर ठाम राहण्यास आता भाग पाडलं आहे, त्यामुळे मी राजीनामा देत आहे, असं शहजाद पूनावाला यांनी म्हटलं आहे. यावेळी पूनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नितीन नबीन यांचे देखील आभार मानले आहेत.

Follow Us
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले,
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले, पुर्ण 58 लाख...
रस्त्याच्या दुरवस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
Sanjay Raut | देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ तुफान व्हायरल
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक