अमेरिका इराण युद्धादरम्यान सर्वात मोठी बातमी; अखेर मध्य पूर्वेत पाकिस्तानची एन्ट्री , तब्बल 8000 सैन्य मैदानात

मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे. काही तरी मोठं घडण्याचे संकेत मिळत आहेत. अखेर मध्य पूर्वेत पाकिस्तानची एन्ट्री झाली आहे. तब्बल 8000 हजार सैनिक मैदानात उतरलं आहे. घडामोडींना वेग आला आहे.

अमेरिका इराण युद्धादरम्यान सर्वात मोठी बातमी; अखेर मध्य पूर्वेत पाकिस्तानची एन्ट्री , तब्बल 8000 सैन्य मैदानात
pakistan
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 18, 2026 | 7:12 PM

अमेरिका आणि इराणमध्ये सध्या युद्धविराम सुरू आहे., मात्र तरी देखील दोन्ही देशांमधील संघर्ष अजूनही काही कमी झालेला नाहीये. एकीकडे इराणनने युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजवर नाकेबंदी केली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये दोन्ही देशांकडून एकमेकांच्या जहाजांवर हल्ले सुरूच आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिली आहे, जर पूर्ण युद्धविराम लवकरात लवकर नाही झाला तर त्याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे इराण देखील माघार घेण्यास तयार नाहीये. दरम्यान स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जाहाजांसाठी बंद असल्यामुळे जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा मोठा फटका हा भारताला देखील बसत असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आता मध्यपूर्वेत पाकिस्तानच्या सैनिकांची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये एक संरक्षण करार झाला आहे, या करारानुसार आता पाकिस्तानने आपले तब्बल 8 हजार सैनिक सौदी अरेबियामध्ये तैनात केले आहेत. पाकिस्तानने केवळ सैनिकच नाही तर आपले काही लढाऊ विमानं देखील सौदी अरेबियामध्ये तैनात केले आहेत. रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार तीन संरक्षण अधिकारी आणि दोन सरकारी सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. झालेल्या करारानुसार सौदी अरेबियाच्या सौन्यांना सौन्य ताकद पुरवण्याच्या उद्देशानं पाकिस्तानने आपले आठ हजार सौनिक सौदीमध्ये तैनात केले आहेत.

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम असल्यामुळे सध्या तरी मध्यपूर्वेत थोडी शांतता आहे. मात्र अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होऊ शकतं अशी सध्याची स्थिती आहे. या युद्धामध्ये आखाती देशांचं आधीच प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे सध्या मध्य पूर्वेतील देश चिंतेत आहेत. आता पाकिस्तानने सौदीमध्ये आपलं सैन्य तैनात केल्यानं पुन्हा एकदा मध्य पूर्वेत काही मोठं घडणार आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us