AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! तामिळनाडूमध्ये खेला होबे, एआयएडीएमके सत्तेत येणार? काँग्रेसने विजय यांना पाठिंबा देताच मोठ्या घडामोडी

तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांनी दोन्ही द्रवीड पक्षांना मोठा धक्का दिला आहे. टीव्हीकेला राज्यात सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. मात्र आता तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला असून, सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! तामिळनाडूमध्ये खेला होबे, एआयएडीएमके सत्तेत येणार? काँग्रेसने विजय यांना पाठिंबा देताच मोठ्या घडामोडी
Thalapathy VijayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 06, 2026 | 5:01 PM
Share

सोमवारी चार मे रोजी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकाचे निकाल लागले. या निवडणुकांमध्ये देखील भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. तर दुसरीकडे आसाममध्ये भाजपने आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवलं आहे. पुडुचेरीमध्ये देखील भाजपचीच सत्ता आली आहे. मात्र दुसरीकडे केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोठा उलटफेर पहायला मिळाला. केरळमध्ये डाव्यांच्या एकमेव गडाला काँग्रेसने सुरूंग लावला. तर दुसरीकडे तामिळनाडूमध्ये डीएमके आणि एआयएडीएमकेला थलपती विजय यांच्या टीव्हीकेने जोरदार धक्का दिला आहे. तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांना सर्वाधिक जागा मिळाल्या.

दरम्यान त्यानंतर आता काँग्रेसने तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांना पाठिंबा जाहीर केला आहे. जर आपण पाठिंबा दिला नाही तर टीव्हीके एआयएडीएमकेला पाठिंबा घेऊ शकतो. एआयएडीएमकेची तामिळनाडूसोबत भाजपबरोबर युती आहे, त्यामुळे असं होऊ नये, यासाठी काँग्रेसने तामिळनाडूमध्ये टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. मात्र काँग्रेसने टीव्हीकेला केवळ बाहेरून पाठिंबा दिला नाही, तर काँग्रेस सत्तेत देखील वाटा मागणार आहे. मात्र काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा जाहीर करताच तामिळनाडूच्या राजकारणात मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे.

काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा देतानाच एक मोठी अट घातली आहे, ती म्हणजे टीव्हीकेनं कोणत्याही परिस्थितीमध्ये एआयएडीएमके सोबत युती करायची नाही. मात्र त्यानंतर आता थलपती विजय यांनी मोठी खेळी खेळली आहे. काँग्रेसने पक्षाला पाठिंबा दिला असातना देखील टीव्हीकेनं आता एआयएडीएमकेकडे पाठिंबा मागितला आहे. थलपती विजय यांनी केवळ एआयएडीएमकेकडेच पाठिंबा मागितला नाही तर एआयएडीएमकेचा मित्र पक्ष असलेल्या पीएमकेकडे देखील विजय यांनी पाठिंबा मागितला आहे. याचं महत्त्वाचं कारण हे देखील आहे की जरी काँग्रेसचा पाठिंबा घेतला असला तरी देखील विजय यांना सत्ता स्थापन करण्यासाठी आणखी पाच आमदारांची गरज आहे. तसेच भविष्यात यामुळे काँग्रेसवर नियंत्रण ठेवणं सोपं जाणार आहे. मात्र आता हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान जर समजा आता एआयएडीएमकेने थलपती विजय यांना पाठिंबा दिला तर ते सत्तेत बसणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे एआयएडीएमके सत्तेत आलं तर काँग्रेस काय करणार? पाठिंबा काढून घेणार का? हा देखील प्रश्न आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!