Bihar Elections Maithili Thakur : राजकारणात स्टारडमची जादू फ्लॉप ! फक्त मैथिली ठाकूरचा बोलबाला, खेसारीचा दारूण पराभव

बिहार विधानसभा निवडणुकीत गायन आणि लोकप्रियतेचा फारसा प्रभाव पडला नाही. अलीगंज वगळता सर्व जागांवर निवडणूक लढवणारे सेलिब्रिटी उमेदवार पराभूत झाले. अलीगंजमध्ये भाजपच्या मैथिली ठाकूर यांनी विनोद मिश्रा यांचा दणदणीत पराभव केला.

Bihar Elections Maithili Thakur : राजकारणात स्टारडमची जादू फ्लॉप ! फक्त मैथिली ठाकूरचा बोलबाला, खेसारीचा दारूण पराभव
बिहार विधानसभा निवडणूक
Updated on: Nov 15, 2025 | 10:10 AM

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल अखेर लागला असून भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. मात्र या निवडणुकीत भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी उमेदवार आणि मोठ्या नावांना जबर धक्का बसला. अनेक सेलिब्रिटींनी यंदा बिहारमध्ये निवडणूक लढवली. पण मैथिली ठाकूर वगळता कोणालाही यश मिळाला नाही. लोकप्रिय गायिका असलेल्या मैथिली ठाकूर यांनी भाजपच्या तिकीटावर अलीगंज येथून निवडणूक लढवली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत मैथिलीने 11 हजार 730 मतांनी विजय मिळवला. पण इतर उमेदवारांमध्ये, छपरा येथून निवडणूक लढवणारे अभिनेता-गायक खेसारी लाल यादव याच्यासह अनेकांचा दारूण पराभव झाला.

तसेच गायक रितेश पांडेही निवडणूक हरले. त्यांनी कारगहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. एवढंच नव्हे तर पवन सिंग यांच्या पत्नी ज्योती सिंग यांचाही पराभव झाला. त्यांनी कराकट येथून निवडणूक लढवली. सर्वजण आपापल्या मतदारसंघात पराभूत झाले, त्यांच्या लोकप्रियतेचे मतांमध्ये रूपांतर करण्यात अनेक सेलिब्रिटींना अपयश आले.

कोणाला मिळाली किती मतं ?

भारतीय निवडणूक आयोगानुसार, 25 फेऱ्यांच्या मतमोजणीत मैथिली ठाकूर यांना एकूण 84 हजार 915 मतं मिळाली. मैथिली यांनी राजदचे विनोद मिश्रा यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. विनोद मिश्रा यांना 73,185 मते मिळाली. ही जागा 2010 आणि 2015 मध्ये अब्दुल बारी सिद्दीकी (राजद) यांनी जिंकली होती. तर 2020 मध्ये मिश्री लाल यादव (व्हीआयपी) यांनी ही जागा जिंकली.

निवडणूक आयोगाच्या माहितानुसार, राजदचे शत्रुघ्न यादव, ज्यांना खेसारी यादव म्हणूनही ओळखले जाते, ते छपरा मतदारसंघातून 30 फेऱ्यांच्या मतमोजणीत पराभूत झाले. त्यांना 79,245 मतं मिळाली. भाजपच्या छोटी कुमारी यांना
86,845 मतं मिळवत खेसारी यांचा पराभव केला. तर अपक्ष उमेदवार राखी गुप्ता 11,488 खूप पिछाडीवर राहिल्या.

यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीत मोठा बदल झाला. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या, त्या पाठोपाठ जेडीयूचा नंबर आहे. राजद फक्त २५ जागा जिंकल्या तर लोक जनशक्ती पक्षाला 19 जागा मिळाल्या. आणि काँग्रेसला फक्त सहा जागा जिंकता आल्या. या निवडणुकीत एआयएमआयएमने चांगली कामगिरी करत 5 जागा जिंकल्या.