AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारमधील एक गाव, जिथे एकही पुरुष नाही; कारण जाणून डोक्यावर माराल हात!

Bihar Village Story: बिहारमध्ये असं एक गाव आहे जिथे एकही पुरुष राहत नाही... असं एकं वेगळं गाव जेथील एक खास गोष्ट कायम चर्चेत असते आणि म्हणजे, गावात कधीत पुरुष तुम्हाला दिसरणार नाही.. फक्त लहान मुलं आणि महिला गावात दिसतील...

बिहारमधील एक गाव, जिथे एकही पुरुष नाही; कारण जाणून डोक्यावर माराल हात!
बिहार
| Updated on: Nov 14, 2025 | 10:14 AM
Share

Bihar Village Story: प्रत्येक गावाची एक खास गोष्ट असते, तिच गोष्ट त्या गावची एक वेगळी ओळख ठरते. बिहारमध्ये देखील एक असं गाव आहे, जे सध्या चर्चेत आलं आहे. बिहारच्या (Bihar) बांका जिल्ह्यातील कटोरिया-बांका रोडवर महोलिया (Maholiya) हे एक अनोखं गाव आहे. या गावाचं सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्हाला एकही पुरूष दिसणार नाही. गावात तुम्हाला फक्त महिला आणि लहान मुलचं दिसतील… यामागचं कारण जाणून तुम्ही देखील डोक्यावर हात माराल, गावातील जवळजवळ सर्व पुरुष वर्षभर कोलकात्यात स्वयंपाकी (महाराज) म्हणून काम करतात. कोलकात्यात माहोलिया येथील महाराजांचा बोलबाल…

कोलकाता येथील बंगाली कुटुंबांमध्ये मेजवानी ही माहोलियाच्या महाराजांशिवाय अपूर्ण मानली जाते. सुमारे 45 घरांच्या या छोट्याशा गावातले शंभराहून अधिक पुरुष आता कोलकात्यात राहतात आणि तिथले स्वयंपाकघर सांभाळतात. सांगायचं झालं तर, हळू-हळू हे काम गावाची ओळख बनलं आहे. सुरुवातीला काही पुरुष कोलकात्याला गेले, पण आता गावातील पुरुष कोलकाता येथे महाराज म्हणून काम करत आहेत. आता संपूर्ण गावाने हे काम स्वीकारलं आहे.

नावाच्या पुढे लावतात ‘महाराज’

कोलकात्यात त्यांना प्रेमाने “महाराज” असं म्हणतात. आता, गावातील प्रत्येकाने त्यांच्या नावापुढे “महाराज” हे आडनाव जोडलं आहे. जसं की घनश्याम महाराज, सुखदेव महाराज, माधो महाराज. हे टोपणनाव त्यांची ओळख बनले आहे.

घनश्याम महाराज सांगतात की, स्वयंपाक ही गावातील परंपरा नव्हती, पण जेव्हा त्यातून कुटुंबाला रोजगार मिळाला तेव्हा सर्वांनी ते स्वीकारलं. कोलकाता आता त्यांचं दुसरं घर बनलं आहे. काहींनी तर तिथे स्वतःचं घरेही खरेदी केली आहेत.

प्रत्येक महाराजाला त्यांच्या अनुभवानुसार पैसे मिळतात… 10 – 20 हजार रुपये त्यांची महिन्याची कमाई असते… कोलकाता येथे त्यांच्या राहण्याची आण खाण्याची देखील चिंता नसेल… कारण तिकडेच त्यांचं काम असतं. महिन्यातून फक्त काही दिवस काम कमी असतं, अन्यथा ऑर्डर वर्षभर राहतात.

गावात फक्त राहतात महिला

महोलियामध्ये पुरूषांची अनुपस्थिती असूनही, गावातील महिला शेती, मुलांचे शिक्षण आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळतात. मात्र, पुरूष फक्त सण किंवा खास प्रसंगीच गावी येतात.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...