बिहारमधील एक गाव, जिथे एकही पुरुष नाही; कारण जाणून डोक्यावर माराल हात!

Bihar Village Story: बिहारमध्ये असं एक गाव आहे जिथे एकही पुरुष राहत नाही... असं एकं वेगळं गाव जेथील एक खास गोष्ट कायम चर्चेत असते आणि म्हणजे, गावात कधीत पुरुष तुम्हाला दिसरणार नाही.. फक्त लहान मुलं आणि महिला गावात दिसतील...

बिहारमधील एक गाव, जिथे एकही पुरुष नाही; कारण जाणून डोक्यावर माराल हात!
बिहार
| Updated on: Nov 14, 2025 | 10:14 AM

Bihar Village Story: प्रत्येक गावाची एक खास गोष्ट असते, तिच गोष्ट त्या गावची एक वेगळी ओळख ठरते. बिहारमध्ये देखील एक असं गाव आहे, जे सध्या चर्चेत आलं आहे. बिहारच्या (Bihar) बांका जिल्ह्यातील कटोरिया-बांका रोडवर महोलिया (Maholiya) हे एक अनोखं गाव आहे. या गावाचं सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्हाला एकही पुरूष दिसणार नाही. गावात तुम्हाला फक्त महिला आणि लहान मुलचं दिसतील… यामागचं कारण जाणून तुम्ही देखील डोक्यावर हात माराल, गावातील जवळजवळ सर्व पुरुष वर्षभर कोलकात्यात स्वयंपाकी (महाराज) म्हणून काम करतात.
कोलकात्यात माहोलिया येथील महाराजांचा बोलबाल…

कोलकाता येथील बंगाली कुटुंबांमध्ये मेजवानी ही माहोलियाच्या महाराजांशिवाय अपूर्ण मानली जाते. सुमारे 45 घरांच्या या छोट्याशा गावातले शंभराहून अधिक पुरुष आता कोलकात्यात राहतात आणि तिथले स्वयंपाकघर सांभाळतात. सांगायचं झालं तर, हळू-हळू हे काम गावाची ओळख बनलं आहे. सुरुवातीला काही पुरुष कोलकात्याला गेले, पण आता गावातील पुरुष कोलकाता येथे महाराज म्हणून काम करत आहेत. आता संपूर्ण गावाने हे काम स्वीकारलं आहे.

नावाच्या पुढे लावतात ‘महाराज’

कोलकात्यात त्यांना प्रेमाने “महाराज” असं म्हणतात. आता, गावातील प्रत्येकाने त्यांच्या नावापुढे “महाराज” हे आडनाव जोडलं आहे. जसं की घनश्याम महाराज, सुखदेव महाराज, माधो महाराज. हे टोपणनाव त्यांची ओळख बनले आहे.

घनश्याम महाराज सांगतात की, स्वयंपाक ही गावातील परंपरा नव्हती, पण जेव्हा त्यातून कुटुंबाला रोजगार मिळाला तेव्हा सर्वांनी ते स्वीकारलं. कोलकाता आता त्यांचं दुसरं घर बनलं आहे. काहींनी तर तिथे स्वतःचं घरेही खरेदी केली आहेत.

प्रत्येक महाराजाला त्यांच्या अनुभवानुसार पैसे मिळतात… 10 – 20 हजार रुपये त्यांची महिन्याची कमाई असते… कोलकाता येथे त्यांच्या राहण्याची आण खाण्याची देखील चिंता नसेल… कारण तिकडेच त्यांचं काम असतं. महिन्यातून फक्त काही दिवस काम कमी असतं, अन्यथा ऑर्डर वर्षभर राहतात.

गावात फक्त राहतात महिला

महोलियामध्ये पुरूषांची अनुपस्थिती असूनही, गावातील महिला शेती, मुलांचे शिक्षण आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळतात. मात्र, पुरूष फक्त सण किंवा खास प्रसंगीच गावी येतात.