आधी राम राम ठोकला ! आता पवारांच्या मदतीने नितीश कुमार मोदींच्या विरोधात दंड थोपटणार?

एनडीएतून बाहेर पडल्यानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यानंतर नितीश कुमार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार हे विरोधी पक्षांची मोट बांधत आहेत. यामुळे आज नितीश कुमार यांनी घेतलेली भेट लक्षवेधी ठरली आहे.

आधी राम राम ठोकला ! आता पवारांच्या मदतीने नितीश कुमार मोदींच्या विरोधात दंड थोपटणार?
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 5:15 PM

नवी दिल्ली : एनडीएतून बाहेर पडल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार(Bihar CM Nitish Kumar) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(NCP chief Sharad Pawar) यांची भेट घेतली. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी नितीश कुमार हे भेटीसाठी पोहोचले आले होते. नरेंद्र मोदी यांची साथ सोडल्यानंतर किंबहुना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर नितीश कुमार हे आता शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्याने दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा (Lok Sabha Elections 2024) निवडणुकीची जोरदार तयारी विरोधी पक्षांकडून सुरु झाली आहे. शरद पवारांच्या मदतीने नितीश कुमार मोदींच्या विरोधात दंड थोपटणार आहेत.

एनडीएतून बाहेर पडल्यानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यानंतर नितीश कुमार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार हे विरोधी पक्षांची मोट बांधत आहेत. यामुळे आज नितीश कुमार यांनी घेतलेली भेट लक्षवेधी ठरली आहे.

भाजप विरोधात मोहिम आखण्यासाठी शरद पवार देशभरातील विरोधी पक्ष नेत्यांची फळी उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. या आधी राहुल गांधींनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यासोबतच विरोधी पक्षातील जे महत्त्वाचे नेते आहेत शरद पवार यांची भेट घेत आहेत.

मोदींविरोधात पंतप्रधान पदाचा प्रबळ दावेदार निवडण्याबाबत अद्याप विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये एकमत झाले नसले तरी मोदींना पाय उतार करण्याचा प्लान विरोधी पक्ष आखत आहे.

दुसरी कडे भाजपचे दिग्गज नेते थेट बारामतीत येऊन पवार कुटुंबीयांना टार्गेट करण्याची भाषा करत महाराष्ट्र मिशनची घोषणा करत आहेत. त्यातच पवारांनी थेट मोदींनाचा नितीश कुमारांच्या माध्यमातून धक्का देण्याची तयारी केलीय का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.