विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! पोलिसांकडून पाण्याचा फवारा, आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवले; पाटण्यात नेमकं काय घडतंय?
बिहारमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं आहे. बिहार पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर पाण्याचा फवारा मारण्यात आला. त्यानंतर आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवले. पाटण्यात नेमकं काय घडतंय? जाणून घ्या

बिहारची राजधानी पाटण्यात विद्यार्थ्यांचें आंदोलन भडकलं आहे. विद्यार्थ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या घराच्या दिशेने काढलेल्या मार्चने राजकीय वातावरण तापलं. मार्चच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 70 वी BPSC परीक्षा रद्द करावी, या मागणीसाठी मोठ्या संख्येने आंदोलक विद्यार्थी जमले होते. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. विद्यार्थी आक्रमक झाल्याने बिहारमधील राजकीय वातावरण तापलं आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या काय?
विद्यार्थी आंदोलकांनी प्रशासनाकडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीची मागणी केली आहे . त्याच शिक्षण विभागाचे मुख्य सचिव आणि शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करण्याचीही मागणी केली आहे. पाटण्यातील गर्दनीबागमध्ये अनेक विद्यार्थी संघटना आंदोलनाला बसल्या आहेत. या आंदोलनाला जवळपास 13-14 संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. मुख्यमंत्र्याच्या घेराव घालण्याच्या मागणीला आरजेडीकडूनही पाठिंबा मिळाला आहे. पाटण्यात 70 वी BPSC परीक्षा पुन्हा घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी नकारात्मक गुणपद्धती रद्द करणे आणि भरती प्रक्रियेत एकच परीक्षा पद्धत लागू करणे अशा अनेक मागण्या विद्यार्थ्यांच्या आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांनी गांधी मैदानापासून मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या दिशेने मोर्चा काढला.
#WATCH | Patna, Bihar: Police and students come face to face as they march towards Raj Bhavan from Gandhi Maidan, demanding cancellation of the 70th BPSC examination. pic.twitter.com/n0LNfCtRqr
— ANI (@ANI) August 25, 2026
विद्यार्थी आक्रमक, पोलीस प्रशासन अलर्ट
मार्चमध्ये विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर प्रशासन आणि पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलीस आक्रमक विद्यार्थ्यांना रोखण्याची मागणी करत आहेत. तर आंदोलक विद्यार्थी मागण्यांवर ठाम आहेत. भरती परीक्षेत सुधारणांची गरज असल्याची आंदोलकांची मागणी आहे. प्रमुख मागण्यांमध्ये नकारात्मक गुणपद्धती रद्द करणे, नोकर भरतीसाठी एकच परीक्षा पद्धती लागू करणे, 70 वी BPSC परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची मागणी आहे. सर्व मागण्या गांभीर्याने घ्याव्यात, असं विद्यार्थी म्हणत आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे शहारातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचे समोर आलं आहे. आता पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता या प्रकरणावर बिहारचे मुख्यमंत्री सम्राट काय प्रतिनिधी देतात, हे पाहावे लागेल.