सरकारकडून सर्वच काही ..हजरजबाबी IAS अधिकाऱ्याच्या उत्तरावर आता काय बोलावे

| Updated on: Sep 28, 2022 | 8:56 PM

आज मोफत सॅनिटरी पॅड मागितले जातात, उद्या लोकांना निरोधही मोफत द्यावे लागतील असं त्यांनी उत्तर दिल्यावर मात्र अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

सरकारकडून सर्वच काही ..हजरजबाबी IAS अधिकाऱ्याच्या उत्तरावर आता काय बोलावे
Follow us on

पाटणाः सध्या सोशल मीडियावर एका महिला आयएएस अधिकाऱ्यांचा (IAS Officer) व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या एका कार्यक्रमामध्ये उपस्थित असताना एका विद्यार्थिनीने त्यांना मोफत सॅनिटरी पॅड देण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर मात्र अनेकांच्या भुवया उंचवणारे होते. आयएएस अधिकारी हरजोत कौर यांनी दिलेल्या उत्तराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. हरजोत कौर यांनी विद्यार्थिनीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या की, आपल्या मागण्या कधीच संपत नाही.

 

आज मोफत सॅनिटरी पॅड (Sanitary pads) मागितले जातात, उद्या लोकांना निरोधही (Condom) मोफत द्यावे लागतील असं त्यांनी उत्तर दिल्यावर मात्र अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

खरं तर, बुधवारी बिहारची राजधानी पाटणा येथे युनिसेफ सेव्ह द चिल्ड्रन आणि प्लॅन इंटरनॅशनल अंतर्गत महिला आणि बाल विकास महामंडळाने ‘सशक्त बेटी समृद्धी बिहार’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाला इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला महिला विकास महामंडळाच्या मुख्य अधिकारी हरजोत कौर यांना विद्यार्थिंनीनी काही प्रश्न विचारले होते.

या कार्यक्रमप्रसंगी एका विद्यार्थिनीने त्यांना विचारले की, सरकार नागरिकांना अनेक गोष्टी देते. त्यामध्ये गणवेश, शिष्यवृत्ती येते.मग 20-30 रुपयांचे सॅनिटरी पॅड का देऊ शकत नाही असा सवाल विद्यार्थिनीने त्यांना विचारला. यावेळी विद्यार्थिनीच्या या प्रश्नाला उपस्थितांनी टाळ्या वाजवून तिचे कौतूकही केले.

विद्यार्थिनीच्या या प्रश्नाला उत्तर देताना हरजोत कौर यांनी म्हणाल्या की, या प्रश्नावर टाळ्यांचा कडकडाट होत आहे. अशा या मागण्यांना काही अंत आहे का? 20 आणि 30 रुपयांना सॅनिटरी पॅडही मिळू शकते, उद्या मागणी केली तर जीन्स-पॅन्टही मिळू शकते.

आणि दुसऱ्या दिवशी सुंदर चप्पल मागितले तेही देऊ शकतो. आणि जर उद्या कुटुंब नियोजनाच प्रश्न आला तर निरोधही फुकटच द्यावे लागेल, मग सगळं फुकट घेण्याची सवय का लावून घेता असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला.

हरजोत कौर यांनी सांगितले की, सरकारकडून ते फुकट घेण्याची का गरज आहे. स्वत:ला इतकं समृद्ध करा की सरकारकडून काहीही घेण्याची गरज लागणार नाही.

सरकार खूप काही देत ​​आहे, म्हणून फुकट घेऊ नका. त्यांच्या या प्रश्नावर विद्यार्थिनी म्हणाल्या की, सरकार मत मागण्यासाठी येते. त्यावर त्या म्हणाल्या की तुम्ही देऊ नका मतदान, मग पाकिस्तानसारखं व्हावं लागेल असंही त्यांनी विधान केले.