
भारतात डोसा केवळ डीश नाही तर एक फूड इमोशन आहे. दक्षिण भारतातील ही डीश आता जगभरातील लोकांची पसंतीची डीश बनली आहे. डोसाची लोकप्रियतेने अनेकांचे जीवन बदलले आहे. कधीकाळी रस्त्याच्याकडेला गाडी लावणारे हे डोसेवाले आज कोट्यवधीचे मालक बनले आहे.चला तर पाहूयात भारतातील सर्वात श्रीमंत डोसेवाले..ज्यांनी अनेकांच्या जीभेचे चोचले पुरवत डोसा बिजनसमध्ये स्वत:चे साम्राज्य उभे केले आहे.
साल 2021 मध्ये राघवेंद्र राव आणि त्यांची पत्नी दिव्या राव यांनी केवळ पाच लाख रुपयात या कॅफेची सुरुवात केली होती. सुरुवातीला ते स्वत:च डोसा बनवायचे आणि कॉफी देखील पाजायचे. त्यांच्या क्रिस्पी डोसे आणि फिल्टर कॉफीचा स्वाद इतका लाजबाव आहे ती सोशल मीडियावर हा कॅफी प्रचंड व्हायरल झाला.
त्याची पहिल्या महिन्याची कमाई 30-40 हजार रुपये होती. परंतू आज त्यांचा टर्नओव्हर 50 कोटीहून अधिक आहे. येथे दिवसाचे 6 ते 7 हजार डोसे विकले जातात.आणि सकाळी सहा वाजल्यापासून ग्राहकांची रांग लागते. आज या ब्रँडची व्हॅल्यू सुमारे 18,800 रुपयांपर्यंत पोहचली आहे.
तामिळनाडूतून मुंबईत आलेले प्रेम गणपती कधी काही भांडी धुण्याचे काम करायचे. जेव्हा त्यांच्या खिशात 1000 रुपये होते. परंतू त्यांनी हिमंत करुन रस्त्यावर डोशाची गाडी लावली. सुरुवातील रोज 50-100 डोसे विकले जायचे. परंतू त्यांनी डोशात नवनवीन व्हारायटी आणली. उदा. चॉकलेट डोसा, चायनीझ आणि स्प्रिंग रोल डोसा. पाहाता पाहाता ग्राहकांची गर्दी वाढली. आज डोसा प्लाझाचे 72 हून अधिक आऊटलेट आहेत. येथे रोज 20,000 डोसे विकले जातात. यांची वार्षिक कमाई 30-40 कोटी रुपये आहे.
गरीबीत वाढलेले जयराम बनन यांनी मुंबईत भांडी धुण्याचे आणि वेटरचे काम केले. त्यांचे स्वप्न साऊथ इंडियन हॉटेल उघडण्याचे. त्यांनी पुढे जाऊन दिल्लीत Sagar Ratna ची सुरुवात केली. येथील इडली-सांभार आणि मसाला डोसा लोकांना खूप आवडू लागला. त्यांना पहिल्या महिन्याची कमाईल केवळ 500-600 रुपये होती. आज त्यांचा टर्नओव्हर 300 कोटी रुपये आहे.
पीसी मुस्तफा शाळेत नापास झाले होते, त्यामुळे त्यांना मजूरी करावी लागली. त्यानंतरही ते संघर्ष करत इंजिनिअर झाले. त्यानंतर त्यांनी विचार केला की लोक डोशाचे बॅटर घरीच तयार करण्यात का वेळ दवडताहेत.त्यामुळे त्यांनी 50,000 रुपयांतून ID Fresh Foods ची सुरुवात केली. पहिल्या दिवशी त्यांचे केवळ 15 पॅकेट विकले आणि कमाई 500 रुपये झाली. परंतू आज कंपनी रोज 1.3 लाख किलो बॅटर विकते.त्यातून 13-15 लाख डोसे तयार होतात. आज या कंपनीची व्हॅल्यू 350-400 कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे.
चेन्नईतील छोटे हॉटेल उघडून पी. राजगोपाल यांनी इडली-डोसा विकणे सुरु केले. त्यांची क्वालिटी इतकी जबरदस्त होती की त्यांचा ब्रँड परदेशापर्यंत पसरला. सुरुवातीला 5-10 रुपयांची डीश विकायचा. आज सरवण भवनात 28 देशांत 100हून अधिक आऊटलेट आहेत. येथे रोज 50-60 हजार डोसे विकले जाते. NRI लोक म्हणतात की,’ इंडियन डोसा खायचा असेल तर सरवण भवनला चला..’
1924 मध्ये सुरु झालेले हे हॉटल त्याच्या बटरवाल्या डोशासाठी प्रसिद्ध आहे. येथील डोसा इतका क्रिस्पी आणि जाड असतो की लोक याला आर्ट वर्क देखील म्हणतात. याची सुरुवातीला रोज 50-60 डोसे विकले जायचे. आज ही संख्या रोज 2000-3000 डोसे इतकी वाढली आहे.आता हा एक रेडी टू ईट ब्रँड देखील आहे.याची व्हॅल्यू हजारो कोटी रुपयात आहे.