बिर्याणी विकणारा मालकाच्या बायकोला घेऊन पळाला, मग तीन दिवसांनी गावांत धिंगाणा झाला

घटनेची माहीती होताच पोलीस घटनास्थळी आले. त्यानंतर या प्रकरणात ठेला मालक आणि त्याच्या सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

बिर्याणी विकणारा मालकाच्या बायकोला घेऊन पळाला, मग तीन दिवसांनी गावांत धिंगाणा झाला
| Updated on: Apr 18, 2025 | 3:44 PM

एका बिर्याणी विक्रेत्याने त्याच्याकडे मदतनीस म्हणून बिरयानी बनविण्यासाठी एका तरुणाला कामला ठेवले होते. या तरुणाला त्याच घरात पोटमाळ्यावर त्याने भाड्याने घर दिले होते. सर्वकाही ठिक चालू होते. त्याचा बिरयानीचा व्यवसाय तूफान चालू लागला, परंतू ११ एप्रिल रोजी अचानक त्याच्या सोबत दुकानात काम करणारा हा तरुण त्याच्या पत्नीलाच घेऊन पसार झाला. तीन दिवस हे दोघे बेपत्ता होते….

उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा पश्चिम येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका ठेलेवाल्याने बिर्याणीचा धंदा सुरु केला. हा धंदा हळूहळू खूप चालू लागला.त्यामुळे त्याने त्याच्या हाताखाली काम करण्यासाठी एक मुलगा कामाला ठेवला. या मुलाला भाड्याने घर मिळेना म्हणून मोठ्या विश्वासाने या व्यावसायिकाने या तरुण मुलाला आपल्या घरात पोटभाडेकरु म्हणून ठेवले. त्यानंतर त्याचा बिरयानीचा धंदा तुफान चालू लागला. यामुळे या व्यावसायिक खूश झाला. परंतू या मुलाचे आणि त्याच्या पत्नीचे दोघांचे झेंगाट चालू झाले.त्यानंतर १९ एप्रिल रोजी तरुणाने प्रत्यक्ष मालकाला गुंगारा देत त्याच्या पत्नीला घेऊन तो पसार झाला.तीन दिवस हे दोघे जण गायब होते. त्यानंतर या महिलेला पुन्हा घरी सोडायला तो आला. तेव्हा मालकाने त्याला पकडले आणि आपल्या वडीलांच्या मदतीने त्याची चांगलीच धुलाई केली. आता जखमी झालेल्या या मुलाचा एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.पोलिसांनी ठेला मालक आणि त्याचा बाप म्हणजे या महिलेच्या सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एकाच घरात राहायचे…

हे प्रकरण नोएडा वेस्टच्या चिपियाना गावचा आहे. येथे राहणारा एक जण बिरयानी बनवून त्याची विक्री करायचा. त्यानं बनविलेली बिर्याणीनी चांगली चवीला होती. त्यामुळे त्याच्या बिर्याणीला खूपच मागणी वाढली त्यामुळे त्याने ठेल्यावर काम करण्यासाठी एका मुलाला कामाला ठेवले, त्याने आधी इमानदारीने काम केले. त्यामुळे त्याला राहायला विश्वासाने मालकाने त्याच्या घरातच पोट माळ्यावर जागा केली. त्यानंतर ११ एप्रिलला पहाटे हा तरुण मालकाच्या बायकोसोबत पसार झाला. त्यानंतर तीन दिवस या दोघांचा काहीही थांगपत्ता लागला नाही.  मालक आणि त्याचा म्हातारा बाप दोघांना शोधून शोधून थकले.. एके दिवशी

येथेच्छ बदडून काढले

त्यानंतर १५ एप्रिल रोजी त्याने त्या मालकाच्या पत्नीला घरी सोडला आला. त्यावेळी मालक घरातच होता. त्याने  मालकाने आणि  त्याच्या बापाने (महिलेच्या सासऱ्यांनी ) दोघांनी मिळून त्याला पकडले. आणि लाठ्या काठ्यांनी त्याला येथेच्छ बदडून काढले. त्याला प्रचंड जखमी अवस्थेत त्याच्या नातेवाईकांनी दिल्लीच्या एका रुग्णालयात दाखल केले आहे आता त्याची प्रकृती स्थिर असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.