AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटक निवडणुकीपूर्वी येडियुरप्पा यांची राजकारणातून निवृत्ती? काय आहे कारण?

विरोधक म्हणतात की मला मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आले. हे चुकीचे आहे. येडियुरप्पा यांना कोणीही मुख्यमंत्रीपदावरून हटवले नव्हते.

कर्नाटक निवडणुकीपूर्वी येडियुरप्पा यांची राजकारणातून निवृत्ती? काय आहे कारण?
भाजप नेते येडियुरेप्पा
| Updated on: Feb 23, 2023 | 4:29 PM
Share

बेंगळुरु : कर्नाटकमध्ये काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका (karnataka assembly election) होणार आहेत. राज्यातील सत्ताधारी भाजप पुन्हा एकदा पुनरागमन करण्याच्या प्रयत्न करत आहे. परंतु त्यापूर्वी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. बुधवारी विधानसभेत त्यांनी निरोपाचे भाषण केले. ते म्हणाले की, हे माझे निरोपाचे भाषण आहे. हा एक दुर्मिळ क्षण आहे, कारण आता मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.

मोदींचे मानले आभार

भाषणात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले. देवाने मला शक्ती दिली तर येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेत आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी आधीच सांगितले आहे की, आता मी निवडणूक लढवणार नाही, पण पंतप्रधान मोदी आणि पक्षाने मला दिलेला सन्मान आणि पद मी आयुष्यभर विसरू शकणार नाही.

वयामुळे घेतला निर्णय

आपल्या भावनिक भाषणात ते म्हणाले की, विरोधक म्हणतात की मला मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आले. हे चुकीचे आहे. येडियुरप्पा यांना कोणीही मुख्यमंत्रीपदावरून हटवले नव्हते. येडियुरप्पा यांनी वयामुळे हा निर्णय घेतला होता.

येडियुरप्पा म्हणाले की, निवडणूक न लढवण्याचा अर्थ असा नाही की ते घरी बसणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचा दौरा करून पक्ष आणि अन्य उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. पक्ष मोठा आणि मजबूत करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार आहे.

येडियुरप्पा यांच्या जागी कोण

येडियुरप्पा यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार नाही आणि शिकारीपुरा जागा सोडणार असल्याचे जाहीर केले होते. हायकमांडने परवानगी दिल्यास त्यांचे पुत्र आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बीवाय विजयेंद्र या जागेवरून निवडणूक लढवतील.

येदियुरप्पा यांचा प्रभाव

लिंगायत समाजातील प्रभावशाली नेता व माजी मुख्‍यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचा प्रभाव कमी होत आहे. यामुळे काँग्रेस या ठिकाणी आपली शक्ती खर्च करत आहे. भाजप लिंगायत समाजातील प्रभावशाली नेत्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच जे भाजपमधून बाहेर पडले आहे, त्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मोदी यांच्या सभा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा अजून झालेली नाही. परंतु भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांपासून पक्षाचे अनेक प्रमुख नेते व केंद्रीय मंत्री कर्नाटकात येणार आहे. १ मार्चपासून भाजपकडून चार विजय संकल्प रथयात्रा काढण्यात येणार आहे. राज्याच्या चारही दिशांमधून काढण्यात येणाऱ्या या रथयात्रेत पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणांहून या रथयात्रांना हिरवा झेंडा दाखवतील.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.