AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिरासाठी मिळालेल्या दानातून भाजपचे नेते दारू ढोसतात: काँग्रेस आमदार

माजी केंद्रीय मंत्री आणि झाबुआ येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार कांतिलाल भूरिया यांनी राम मंदिरावरून वादग्रस्त विधान केलं आहे. (BJP leaders drink alcohol from Ram temple donations says Kantilal Bhuria)

राम मंदिरासाठी मिळालेल्या दानातून भाजपचे नेते दारू ढोसतात: काँग्रेस आमदार
| Updated on: Feb 02, 2021 | 10:29 AM
Share

भोपाळ: माजी केंद्रीय मंत्री आणि झाबुआ येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार कांतिलाल भूरिया यांनी राम मंदिरावरून वादग्रस्त विधान केलं आहे. भाजप नेते राम मंदिराच्या नावाने निधी गोळा करतात आणि संध्याकाळी त्या पैशातून दारू ढोसतात, असं वादग्रस्त विधान कांतिलाल भूरिया यांनी केलं असून त्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. (BJP leaders drink alcohol from Ram temple donations says Kantilal Bhuria)

मध्यप्रदेशातील पेटलावद येथे एका धरणे आंदोलनादरम्यान कांतिलाल भूरिया यांनी हे वादग्रस्त विधान केलं. भूरिया हे दोनदा केंद्रीय मंत्री, 5 वेळा खासदार राहिलेले आहेत. सध्या ते आमदार आहेत. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात येत असून त्यासाठी संपूर्ण देशातून विश्व हिंदू परिषद आणि भाजपने निधी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही संघटनांनी हे राष्ट्रव्यापी अभियान हाती घेतलं आहे. लोकांकडून स्वेच्छेने वर्गणी घेतली जात आहे. त्यातच कांतिलाल भूरिया यांनी वादग्रस्त विधान करून एकच खळबळ उडवून दिली आहे. भूरिया यांच्या या विधानावर मध्यप्रदेशातून संताप व्यक्त केला जात आहे.

काँग्रेसकडून निधी जमा

मध्यप्रदेशात काँग्रेसेनेही राम मंदिरासाठी निधी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे आमदार पी. सी. शर्मा यांनीही मध्यप्रदेशात निधी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. राम मंदिर पूर्ण होणं म्हणजे राजीव गांधी यांचं स्वप्न पूर्ण होण्यासारखच आहे, असं शर्मा म्हणाले होते.

कमलनाथ, दिग्विजय सिंह काय म्हणाले?

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते कमलनाथ यांनीही राम मंदिर निर्मितीचं स्वागत केलं होतं. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाही अयोध्येत राम मंदिर व्हावं असं वाटत होतं, असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं होतं. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनीही मंदिरासाठी निधी गोळा करण्यास सुरुवात केली होती. (BJP leaders drink alcohol from Ram temple donations says Kantilal Bhuria)

संबंधित बातम्या:

Post Budget 2021-22 : सोने-चांदी ते पेट्रोल-डिझेल, काय स्वस्त काय महाग?

मोदींच्या पुतणीला भाजप तिकीट देणार का? अहमदाबादमधून निवडणूक लढवण्याची इच्छा!

नागपूरचा बाबा, लंडनची मैत्रिण, फेसबुकवर मैत्री, थेट खिशाला कात्री !

(BJP leaders drink alcohol from Ram temple donations says Kantilal Bhuria)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.