अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेले वक्तव्य भाजपला भोवले; दिल्ली विधानसभेतून 3 आमदार निलंबित

| Updated on: Mar 28, 2022 | 4:59 PM

नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या विरोधात भाजप (BJP) आमदारांनी अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल (Ram Niwas Goel) यांनी सोमवारी भाजपच्या तीन आमदारांचे दिवसभरासाठी निलंबन केले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात बाकावर उभा राहून आणि आप पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्याबद्दल भाजपच्या तीन आमदारांचे दिवसभरासाठी निलंबन करण्यात आले. या […]

अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेले वक्तव्य भाजपला भोवले; दिल्ली विधानसभेतून 3 आमदार निलंबित
AAP vs BLP Delhi MLA Suspend
Image Credit source: Twitter
Follow us on

नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या विरोधात भाजप (BJP) आमदारांनी अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल (Ram Niwas Goel) यांनी सोमवारी भाजपच्या तीन आमदारांचे दिवसभरासाठी निलंबन केले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात बाकावर उभा राहून आणि आप पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्याबद्दल भाजपच्या तीन आमदारांचे दिवसभरासाठी निलंबन करण्यात आले. या कारवाईनंतर भाजपकडूनही आपवर जोरदार टीका करण्यात आली.

विधानसभेच्या अध्यक्ष राम निवास गोयल यांनी आमदार अनिल वाजपेयी, जितेंद्र महाजन आणि अजय महावर यांना सभापतींनी खाली बसण्याची विनंती केल्यावरही ते बाकावर उभा राहिले त्यानंतर त्यांना जाण्यास सांगण्यात आले मात्र ते गेले नाहीत म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले.


दिवसभरासाठी निलंबन

दिल्ली विधानसभेतून दिवसभरासाठी तीन आमदारांचे निलंबन करण्यात आल्यानंतर सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर सकाळी दुसऱ्यांदा सभागृहाचे कामकाज सुरू करण्यात आले. दिल्ली सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर भाजप आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही घोषणाबाजी सुरु असतानाच आमदारांनी वेलमध्ये प्रवेश केला. यावेळी आपचे आमदार मोहिंदर गोयल यांनी गुप्ता यांनी माफी मागण्याचीही त्यांनी मागणी केली.


निलंबनाची जोरदार चर्चा

दिल्ली विधासभेतून भाजपच्या तीन आमदारांचे निलंबन करण्यात आल्यानंतर दिवसभर या गोष्टीची जोरदार चर्चा चालू होती. भाजपच्या आमदारांनी आपबद्दल आणि मुख्यमंत्र्यांबद्दल अपमानस्पद वागणूक दिल्याबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली.

संबंधित बातम्या 

Dattatraya Bharne| राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हा ‘रेस घोडा’ तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हा ‘नाचणारा घोडा’.. कुणी केली अशी जहरी टीका?

दिल्ली पोलिसांची नाशिकमध्ये पुन्हा कारवाई; पिस्तुल, काडतूस विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या

Petrol Price Hike | पुण्यात पेट्रोल दरवाढी विरोधात निषेध आंदोलन ; राष्ट्रवादीने केंद्र सरकारची काढली प्रतीकात्मक अंतयात्रा