AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dattatraya Bharne| राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हा ‘रेसचा घोडा’ तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हा ‘नाचणारा घोडा’.. कुणी केली अशी जहरी टीका?

भविष्यात प्रशांत पाटील हे हर्षवर्धन पाटलांचे एकेक किस्से बाहेर काढतात की काय? अशी चर्चा आता इंदापुरात रंगू लागलेली आहे.एकूणच राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची राजकारणातली हर्षवर्धन पाटलांच्या विरुद्ध अशी ही खेळी यशस्वी होत असल्याचे चित्र सध्या इंदापूरकर पहात आहेत.

Dattatraya Bharne| राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हा 'रेसचा घोडा' तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हा 'नाचणारा घोडा'.. कुणी केली अशी जहरी टीका?
प्रशांत पाटील याची हर्षवर्धन पाटलांवर टीका Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 5:23 PM
Share

इंदापूर – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे(Minister of State Dattatraya Bharne)  यांची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधातली राजकीय खेळी यशस्वी होत असल्याचे सध्या दिसून येत आहे. कारण काही महिन्यांपूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Former Minister Harshvardhan Patil) यांचे चुलत बंधू प्रशांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पक्ष प्रवेश घेतला होता. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरातच सुरंग लावण्यात राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यशस्वी झाले होते. हर्षवर्धन पाटील यांच्या बावड्या गटातच त्यावेळी धुमाकूळ उडाला होता. प्रशांत पाटील यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे प्रशांत पाटलांना नेहमीच कायम सोबत घेऊन फिरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना मंत्रालयाची वारीही घडवून आणली होती. भरणे नेहमीच इंदापूर (Indapur ) तालुक्यातील कार्यक्रमात प्रशांत पाटील यांना घेऊन कार्यक्रम करीत आहे. मागील काही दिवसांपासून इंदापूर तालुक्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उद्घाटन व भूमिपूजन यांचा सपाटाच लावलेला आहे, या प्रत्येक कार्यक्रमात प्रशांत पाटील हे नेहमीच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत दिसून येत आहेत.

आपला घोडा रेस चा त्याचा नाचणारा..

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कधीकाळी सहकारी असणारे त्यांचे चुलत बंधू आता त्यांच्या विरोधात आगपाखड करत असल्याचं दिसून येत आहे, इंदापूर तालुक्यातील काटी या गावात काल रात्री विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटने करण्यात आली यावेळी प्रशांत पाटील यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता जहरी टीका केलेले आहे. प्रशांत पाटील भरसभेत म्हणाले, “आपण आपल्या कार्यक्रमात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोड्यावरती मिरवणूक काढल्यानंतर समोरची पार्टी ही (हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता) लगेच आपले अनुकरण करत त्यांची ही घोड्या वरती मिरवणूक काढतात, मात्र आपला घोडा म्हणजेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना उपमा देत आपला घोडा हा “रेसचा घोडा” असून पुढचा घोडा हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता तो घोडा हा “नाचणारा घोडा” आहे, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांच्यावर ती आगपाखड केली.

इंदापुरात चर्चा प्रशांत पाटील यांच्या अशा कडव्या भाषणाची ही सध्या सुरुवात झाली असून भविष्यात प्रशांत पाटील हे हर्षवर्धन पाटलांचे एकेक किस्से बाहेर काढतात की काय? अशी चर्चा आता इंदापुरात रंगू लागलेली आहे.एकूणच राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची राजकारणातली हर्षवर्धन पाटलांच्या विरुद्ध अशी ही खेळी यशस्वी होत असल्याचे चित्र सध्या इंदापूरकर पहात आहेत.

Jasprit Bumrah Mumbai Indians: “छोडा ना यार, ये बुमराह-वुमराह क्या करेगा?”, विराट कोहलीने धुडकावला होता सल्ला

Petrol Price Hike | पुण्यात पेट्रोल दरवाढी विरोधात निषेध आंदोलन ; राष्ट्रवादीने केंद्र सरकारची काढली प्रतीकात्मक अंतयात्रा

Pune | नवीन कामगार कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी, पुण्यात कामगार संघटना एकवटल्या

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.