Jasprit Bumrah Mumbai Indians: “छोडा ना यार, ये बुमराह-वुमराह क्या करेगा?”, विराट कोहलीने धुडकावला होता सल्ला

Jasprit Bumrah Mumbai Indians: छोडा ना यार, ये बुमराह-वुमराह क्या करेगा?, विराट कोहलीने धुडकावला होता सल्ला
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह
Image Credit source: AFP

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हे नाव ऐकलं की, आज भल्या भल्या फलंदाजांना धडकी भरते. जसप्रीत बुमराह तिन्ही फॉर्मेटमधील भारताचा प्रमुख गोलंदाजच नाही, तर आधारस्तंभ आहे.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Mar 28, 2022 | 4:36 PM

लखनौ: जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हे नाव ऐकलं की, आज भल्या भल्या फलंदाजांना धडकी भरते. जसप्रीत बुमराह तिन्ही फॉर्मेटमधील भारताचा प्रमुख गोलंदाजच नाही, तर आधारस्तंभ आहे. संघाला गरज असताना, जसप्रीत बुमराहने कधीच निराश केलेलं नाही. विकेट मिळवणं गरजेच असताना त्याने विकेट मिळवून दिल्यात. धावा रोखणं आवश्यक असताना, त्याने धावा रोखल्यात. जसप्रीत बुमराहची गोलंदाजीची Action विचित्र वाटत असली, तरी त्याच्या यॉर्कर चेंडूंना तोड नाही. दिशा आणि टप्पा यावर त्याच पूर्णपणे नियंत्रण असतं. जसप्रीत बुमराहची गोलंदाजी यामुळेच वेगळी ठरते. परदेशी खेळपट्ट्यांवर तर हा गोलंदाज जास्त घातक आहे. सात-आठ वर्षांपूर्वी याच बुमराहबद्दल विराट कोहलीने (Virat kohli) एक सल्ला धु़डकावून लावला होता. बुमराहमध्ये असं काय खास आहे, तो काय करणार? असं विराटच मत होतं. पण आज याच बुमराहने क्रिकेट जगताला आपली दखल घ्यायला लावली आहे. सात ते आठ वर्षापूर्वीचा हा किस्सा आता पार्थिव पटेलने (Parthiv Patel) सांगितला.

पार्थिव पटेलने सांगितला तो किस्सा

पार्थिव पटेल त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळायचा. पार्थिवने 2014 साली जसप्रीत बुमराह बद्दल विराट कोहलीला सांगितलं होतं. या गोलंदाजाला एकदा बघं, असं पार्थिव म्हणाला होता. विराट कोहलीने 2013 साली RCB ची कॅप्टनशिप स्वीकारली. 2021 पर्यंत तो RCB चा कॅप्टन होता. या इतक्या वर्षात विराटला आरसीबीला एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवून देता आले नाही. पार्थिव पटेल जो आता सर्व फॉर्मेटमधून निवृत्त झालाय, एकवेळ तो या संघाचा मुख्य भाग होता.

विराटचीच पहिली विकेट काढली

जसप्रीत बुमराहबद्दल मी विराट कोहलीला सांगितलं होतं. पण त्याने त्यावेळी फार रस दाखवला नाही, असं पार्थिव पटेल यांनी सांगितलं. जसप्रीत बुमराहने आधीच 2013 साली मुंबई इंडियन्सकडून डेब्यू केला होता. विराट कोहलीच जसप्रीत बुमराहचा पहिला विकेट होता.

आपण काय बोलतोय, हे पार्थिव पटेलला माहित होतं

2014 साली मी RCB मध्ये होतो. त्यावेळी मी कोहलीला बुमराहच नाव सुचवलं होतं. एकदा त्याची गोलंदाजी बघून घे, असं मी त्याला म्हटलं होतं. त्यावर “छोडा ना यार, ये बुमराह-वुमराह क्या करेगा?” असं विराटचं उत्तर होतं. पार्थिव पटेल यांनी क्रिकबझशी बोलताना हा किस्सा सांगितला. आपण काय बोलतोय, हे पार्थिव पटेलला माहित होतं. जसप्रीत बुमराह गुजरातच्या रणजी टीममध्ये होता. पटेलने त्याची गोलंदाजी बघितली होती. बुमराह फलंदाजांना किती त्रास देतोय, हे पार्थिव पटेलला माहित होतं. म्हणून त्याने बुमराहचं नाव विराट कोहलीला सुचवलं होतं.

‘या’ संघाकडून बुमराह पहिल्यांदा रणजी खेळला

“बुमराहची गुजरातच्या रणजी संघात निवड झाली. ते दोन ते तीन वर्ष रणजीमध्ये खेळला. 2013 मध्ये त्याने रणजीत खेळायला सुरुवात केली. 2014 सीजन त्याच्यासाठी फारसा चांगला ठरला नाही. 2015 च्या सीजनमध्ये तो फार काही चमक दाखवू शकला नाही. त्यावेळी सीजनच्या मध्यावरच त्याला घरी पाठवण्याची चर्चा सुरु होती. पण हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा दिसली. मुंबई इंडियन्सने त्याला पाठिंबा दिला. बुमराहची स्वत:ची मेहनत आणि लाभलेल्या पाठिंब्यामुळे त्याच्यातला सर्वोत्तम खेळ समोर आला” असं पार्थिव पटेलने सांगितलं.

संबंधित बातम्या:
RCB vs PBKS, IPL 2022: 10.75 कोटीचा खेळाडू अशी बालिश चूक करणार, तर RCB मॅच कशी जिंकणार?
Mumbai Indians च्या Murugan Ashwin ने टिम सायफर्टची दांडी उडवली तो अप्रतिम गुगली चेंडू एकदा पहाच VIDEO
Who Is Lalit Yadav: ललित यादवमुळे पुन्हा मुंबईची पहिली मॅच ‘देवाला’, त्याने 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याची किमया दोनदा केलीय

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें