दिल्ली पोलिसांची नाशिकमध्ये पुन्हा कारवाई; पिस्तुल, काडतूस विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या

दिल्ली पोलिसांची नाशिकमध्ये पुन्हा कारवाई; पिस्तुल, काडतूस विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या
प्रातिनिधिक छायाचित्र.

फरीदाबादचा टेकचंद दालचंद खेरी आणि हरियाणाचा द्याचंद जयपाल डिलर यांचा दिल्लीत पिस्तुल आणि काडतूस विक्रीचा धंदा. त्यांनी चांगलाच जम बसवला होता. काही काळ सुरळीत चालले. मात्र, त्यांच्यावर पोलिसांची नजर पडलीच. हा ससेमिरा चुकवण्यासाठी त्यांनी थेट नाशिक गाठले होते. भूमाफिया पीयूष तिवारी आणि हे शस्त्रास्त्र विक्रेते इतर कोण-कोणत्या गुन्ह्यात सहभागी आहेत का, याचा छडाही पोलीस आता लावणार आहेत.

चंदन पुजाधिकारी

| Edited By: मनोज कुलकर्णी

Mar 28, 2022 | 4:45 PM

नाशिकः दिल्ली पोलिसांनी (Police) नाशिकमध्ये (Nashik) पुन्हा एक कारवाई करत पिस्तुल आणि काडतूस विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. दोनच दिवसांपू्र्वी दिल्लीत हजारो कोटींचा घोटाळा करून नाशिकमध्ये दडून बसलेल्या ठकसेनाला पोलिसांनी चतुर्भुज केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा दिल्ली (Delhi) पोलिसांनी ही कारवाई केलीय. त्याचे झाले असे की, टेकचंद दालचंद खेरी (वय 30) आणि द्याचंद जयपाल डिलर (वय 25) हे दोन तरुण दिल्लीत पिस्तूल आणि काडतुसांची विक्री करायचे. मात्र, ते पोलिसांच्या रडारवर आले होते. हे पाहता त्यांनी दिल्लीतून धूम ठोकली आणि लपण्यासाठी थेट नाशिक गाठले. मात्र, इथेही त्यांच्या मागे पोलीस टपकले आणि त्यांना अलगद उचलले. या कारवाईमुळे दिल्ली पोलिसांच्या कर्तबगारीचेही कौतुक होत आहे. दिल्ली पोलीस एखाद्याच्या मागे हात धुवून लागले की, ते त्याला अटक करेपर्यंत सोडत नाहीत, हेच यातून समोर येतेय.

मित्राच्या मदतीने रहायचे

फरीदाबादचा टेकचंद दालचंद खेरी आणि हरियाणाचा द्याचंद जयपाल डिलर यांचा दिल्लीत पिस्तुल आणि काडतूस विक्रीचा धंदा. त्यांनी चांगलाच जम बसवला होता. काही काळ सुरळीत चालले. मात्र, त्यांच्यावर पोलिसांची नजर पडलीच. हा ससेमिरा चुकवण्यासाठी त्यांनी थेट नाशिक गाठले. येथे मित्राच्या मदतीने ते रहात होते, पण शस्त्र विकणारे संशयित नाशिकला लपून बसल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. त्यांनी नाशिक येथे येऊन या संशयितांना अटक केली.

दोन दिवसांपूर्वी भूमाफियाला बेड्या

दोनच दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन एका भूमाफियाला बेड्या ठोकल्या आहेत. पीयूष तिवारी असे त्याचे नाव आहे. तिवारीने दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये जमीन खरेदी-विक्रीच्या माध्यमातून तब्बल एक हजार कोटींचा घोटाळा केला आहे. त्याच्यावर या तीन राज्यांमध्ये जवळपास 37 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या शोधासाठी गेल्या 6 महिन्यांपासून दिल्ली पोलिसांनी रात्रीचा दिवस केला होता. तिवारीच्या अटकेवर 50 हजारांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. अखेर त्याला पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन उचलले.

इतर प्रकरणांचाही शोध सुरू

भूमाफिया पीयूष तिवारी आणि हे शस्त्रास्त्र विक्रेते इतर कोण-कोणत्या गुन्ह्यात सहभागी आहेत का, याचा छडाही पोलीस आता लावणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे नाशिकमध्ये रहात होते. याचा सुगावा पोलिसांना लागताच त्यांनी ही कारवाई केली. याबद्दल दिल्ली पोलिसांचे कौतुक होत आहे. उशिराने का होईना सराईत गुन्हेगार ताब्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त होतेय.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें