भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीची सांगता; मोदींकडून नेत्यांना सेवाभाव, साधेपणाचा संदेश

| Updated on: Nov 07, 2021 | 6:29 PM

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीचे उद्घाटन सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. या बैठकीमध्ये भाजपाच्या 342 सदस्यांनी सहभाग घेतला होता.

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीची सांगता; मोदींकडून नेत्यांना सेवाभाव, साधेपणाचा संदेश
PM Narendra Modi
Follow us on

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीचे उद्घाटन सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. या बैठकीमध्ये भाजपाच्या 342 सदस्यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीला पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष नड्डा यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, साधेपणा हेच जीवन असून, नेत्यांनी आपले राहाणीमान साधे ठेवावे. तसेच सेवा हेच आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट मानावे. कोरोना काळात सेवा ही नवी संस्कुती बनली असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या बैठकीत भाजपाची सत्ता असणाऱ्या ज्या ज्या राज्यामध्ये येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत, त्या राज्यातील मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडून आपल्या कामाचे सादरीकरण करण्यात आले.

 मोदींचे कौतुक 

या बैठकीमध्ये  अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. मोदींच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळेच आपण आज कोरोनामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीवर मात करू शकलो. कोरोनाकाळात लॉकडाऊन लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मोदींनी घेतला. लॉकडाऊमुळे देशाची आर्थिक स्थिती कोलमडली होती, मात्र तिला पूर्वपदावर आणण्यासाठी देखील सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे नड्डा यांनी सांगितले. पुढे बोलताना नड्डा म्हणाले की, कोरोना काळात सरकार कायम जनतेच्या पाठीशी उभे राहिले, लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर सुरुवातीच्या तीन महिन्यात सरकारने नागरिकांना सर्व सुविधा घरपोहोच दिल्या.

कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पक्षाला यश 

यावेळी जेपी नड्डा यांनी निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढवल्याबद्दल पक्षाती प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांचे देखील अभिनंदन केले. गेल्या वर्षभरात देशात झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भाजपाला होणाऱ्या मतांची टक्केवारी वाढली आहे. जम्मू काश्मीरमध्ये पक्षाने दमदार कामगिरी केली. याचे सर्व श्रेय कार्यकर्तांना जात असून भविष्यात अशाच कामगिरीची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आगामी विधानसभा निवणुकींमध्ये देखील भाजपाचाचा विजय होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

संबंधित बातम्या 

हरियाणामध्ये स्थानिक तरुणांना खासगी नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण; 15 जानेवारीपासून होणार नव्या कायद्याची अंमलबजावणी

पंजाब सरकारची मोठी घोषणा; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात, सर्वसामान्यांना दिलासा

पाकिस्तानी नौदलाचा गुजरात किनाऱ्यावर गोळीबार, एका भारतीय मच्छिमाराची हत्या