AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वातावरण फिरलं? तब्बल 100 आमदारांचं तिकीट कापणार, आगामी निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लान काय?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत तब्बल 100 आमदारांचं तिकीट कापण्याची शक्यता आहे. तर आगामी निवडणुकीसाठी भाजपने मास्टर प्लान आखला आहे.

वातावरण फिरलं? तब्बल 100 आमदारांचं तिकीट कापणार, आगामी निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लान काय?
bjp Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 1:42 PM
Share

उत्तर प्रदेशमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या जागांवरील निवडणुकीवर साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी देखील तयारी सुरू केली आहे. भाजप यंदा तिकीट वाटपाबाबत सतर्क राहणार असल्याची माहिती हाती आली आहे. उत्तर प्रदेशातील यंदा 100 आमदारांचं तिकीट कापणार असल्याचे बोलले जात आहे. पक्षातील अंतर्गत सर्व्हेनंतर अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. राज्यातील एखाद्या आमदाराच्या विरोधात पदाधिकाऱ्याचा असंतोष असेल, आमदाराच्या विरोधात वातावरण असेल, तर अशा आमदाराला पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता कमी असणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, भाजपने जवळपास 100 आमदारांवर विश्वास कमी दाखवला आहे. अनेक आमदारांचे पदाधिकाऱ्यांशी मतभेद समोर आले आहेत.  तिकीटाचं वाटप करताना आरएसएसचा देखील सल्ला घेतला जाणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून तिकीट वाटप केलं जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप विधानसभा क्षेत्रानुसार सर्व्हे करत आहेत. या व्यतिरिक्त यंदा भाजपकडून सर्वाधिक जागा जिंकण्यावर भर दिला जाणार आहे. भाजप सलग सत्तेत विराजमान होण्यासाठी फिल्डिंग लावत आहे. काही मतदारसंघात दोन वेळा बाजी मारली आहे.

काही मतदारसंघात पदाधिकारी आणि आमदारामधील मतभेद पाहिले जात आहेत. संघटनेतील मतभेदामुळे निवडणुकीवर परिणाम होतो, असा दावा केला जात आहे. या व्यतिरिक्त पक्ष नव्या चेहऱ्यावरही विश्वास दाखवण्याची शक्यता आहे.  मागील काही महिन्यांपासून जेन-झी मोर्चे चर्चेत आहेत. त्यामुळे जेन-झी आंदोलनामुळे निवडणुकीत बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जुन्या चेहऱ्यांना संधी देण्याऐवजी नवीन आणि युवकांना, संधी मिळण्याची शक्यता आहे.

2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची 30 मतदारसंघात घसरण पाहायला मिळाली. 2019 साली झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या 2024 साली झालेल्या निवडणुकीत लोकसभेच्या जागा कमी जिंकल्या. भाजप 62 जागांवरून 33 जागेवर पोहोचलं. मागील लोकसभा निवडणुकीत 49 खासदारांना पुन्हा तिकीट दिलं होतं. त्यातील 27 जणांना पराभवाला सामोरे जावं लागलं. यंदा दोन वेळा जिंकणाऱ्या उमेदवाराविरोधात वातावरण असेल, तर त्या आमादाराला संधी मिळण्याची शक्यता कमी मानली जात आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका