Delhi Blast : दिल्लीत धमाका,पाकिस्तानमध्ये आपत्कालीन बैठक; LoC पासून दूर राहा, या देशाचा पाक लष्कराला इशारा, मोठी अपडेट काय?

Delhi Red Fort Blast Big Update : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात काल आय-20 कारचा स्फोट झाला. त्यात आतापर्यंत 9 जण दगावल्याचे वृत्त आहे. या स्फोटात जैश-ए-मोहम्मदाचा हात असल्याचे तपासात समोर येत आहे. त्यामुळे पाकमध्ये आपत्कालीन बैठक सुरू आहे.

Delhi Blast : दिल्लीत धमाका,पाकिस्तानमध्ये आपत्कालीन बैठक; LoC पासून दूर राहा, या देशाचा पाक लष्कराला इशारा, मोठी अपडेट काय?
दिल्ली स्फोट, पाकिस्तानमध्ये आपत्कालीन बैठक
Updated on: Nov 11, 2025 | 10:41 AM

Lal Kila Blast-Pakistan Emergency Meeting : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात काल 10 नोव्हेंबर रोजी आय-20 कारचा स्फोट झाला. त्यात आतापर्यंत 9 जण दगावल्याचे वृत्त आहे. या स्फोटात जैश-ए-मोहम्मदाचा हात असल्याचे तपासात समोर येत आहे. त्यामुळे पाकमध्ये आपत्कालीन बैठक सुरू आहे. यापूर्वी 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम हल्ला झाला होता. त्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछुट गोळीबार केला होता. भारताने त्यानंतर 9 मे रोजी भल्या पहाटे पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मिरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला चढवला होता. त्यात मौलाना मसूद अझहर याच्या जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी ठार झाले होते.

दिल्लीत धमाका, पाकमध्ये आपत्कालीन बैठक

दिल्लीत काल धमाका झाला. हा हल्ला पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित सदस्यांनी केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. यामुळे तिकडे इस्लामाबादमध्ये सुद्धा हालचालींना वेग आला आहे. या आत्मघातकी हल्ल्यामुळे पाकिस्तानमधील लष्कर आणि राजकीय नेतृत्व पुढे भारताचे पाऊल काय असेल याची चाचपणी करत आहे. तीनही दलाच्या प्रमुखांची आपत्कालीन बैठक सुरु झाली आहे. राजस्थानच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी वायूसेनेने पेट्रोलिंग वाढवली आहे. तर प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांनी मध्यरात्री गुप्तहेर संघटना ISI चे डीजी आणि NSA सोबत बैठक घेतली. त्याचा तपशील समोर आलेला नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर संपले नसल्याचे वक्तव्य यानिमित्ताने पुन्हा समोर आले आहे.

पाकिस्तानी सोशल मीडियात हल्ल्याची भीती

तर दुसरीकडे कालपासून पाकिस्तानच्या सोशल मीडियात दिल्लीतील स्फोटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा हल्ला भारतानेच घडवून आणला आणि त्यानिमित्ताने भारताला पाकिस्तानीशी युद्ध करायचे असल्याचा दावा तिथला मीडिया करत आहे. तर अफगाणिस्तानच्या नागरिकांनी या हल्ल्यामागे जैश असल्याचा दावा करत पाकिस्तानी सोशल मीडियावरील लोकांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील वर्दळीचे ठिकाण असलेल्या चांदणी चौकातच्या जवळ कारमध्ये स्फोट झाला. यामध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला. हा आत्मघातकी स्फोट असल्याचे तपासात समोर येत आहे. अजून यंत्रणांनी याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण यामध्ये पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे कनेक्शन समोर येत आहे. तर भारत पुन्हा हल्ला करण्याची भीती पाकिस्तानातील सोशल मीडियावर वर्तवण्यात येत आहे.

ब्रिटेनचा पाक लष्काराला इशारा

तर ब्रिटेनचे परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांना भारत आणि पाकिस्तानच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर पाक लष्करालाही एलओसीवर कोणतीही कुरापत न करण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकन दुतावासानेही त्यांच्या नागरिकांना जम्मू आणि काश्मीर यात्रेदरम्यान काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. फ्रान्सचा दुतावासानेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जगातील अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तर पाकिस्तानमध्ये बैठकांचे सत्र सुरु आहे.