ओदिशात भीषण अपघात, बस नदीत कोसळून 12 जणांचा मृत्यू

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

भुवनेश्वर : ओदिशामध्ये भीषण अपघात झालाय. महानदीमध्ये बस कोसळून आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालाय, तर 30 च्या आसपास प्रवासी जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. जखमींना कटक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या अपघाताबद्दल दुःख […]

ओदिशात भीषण अपघात, बस नदीत कोसळून 12 जणांचा मृत्यू
Follow us on

भुवनेश्वर : ओदिशामध्ये भीषण अपघात झालाय. महानदीमध्ये बस कोसळून आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालाय, तर 30 च्या आसपास प्रवासी जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

जखमींना कटक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

रस्त्यावर अचानक म्हैस आल्याने बस या म्हशीला धडकली आणि 30 फूट खोल नदीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच यंत्रणा तातडीने कामाला लागली आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. अंधार पडल्यामुळे बचावकार्यात अडथळा आला.