By Election Results 2026 : देशात खरचं मोदी सरकार विरोधी वातावरण आहे का? पोटनिवडणुकांच्या निकालाचे आकडे बघा, आश्चर्य वाटेल
By Election Results 2026 : आज पोटनिवडणुकाचे निकाल जाहीर होणार आहेत. एकूण सहाजागा आहेत. पोटनिवडणुका यासाठी महत्वाच्या असतात कारण त्यातून देशातील वातावरण दिसून येतं. सध्या मोदी सरकार विरोधी वातावरण असल्याची हवा तयार झाली आहे. पण प्रत्यक्षात ग्राऊंड लेव्हलवरील स्थिती वेगळी आहे.

देशात सध्या केंद्र सरकार विरोधात वातावरण निर्मिती सुरु आहे. SIR च्या मुद्यावरुन मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागितला जात आहे. उद्या जंतर-मंतरवर मोठं आंदोलन होणार आहे. सरकारकडून संवैधानिक संस्था कशा ताब्यात घेतल्या आहेत, सरकारकडून कशी दडपशाही सुरु आहे, याचा प्रचार विरोधकांकडून जोर-जोरात सुरु आहे. पण प्रत्यक्षात ग्राऊंड लेव्हलवरील स्थिती मात्र वेगळी आहे. राजस्थानात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हेच दिसून आलेलं. आताही देशभरात सहाजागांवर पोटनिवडणूक होत आहे. तिथेही हेच चित्र आहेत. विरोधकांकडूनी जी वातावरण निर्मिती सुरु आहे, ती प्रत्यक्षात जमिनी स्तरावर दिसत नाहीय.
चार राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण सहाजागांवर आज पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. पश्चिम बंगालच्या नंदीग्राम, रेजीनगर, तामिळनाडूच्या धारापुरम, मदुरंतकम, पुडुचेरीची थट्टनचावडी विधानसभा सीट आणि असमची नगांव लोकसभा सीटसाठी मतमोजणी सुरु आहे. नंदीग्राममध्ये 6 राऊंडची मतमोजणी पूर्ण झाली आहे. भाजपच्या हसीरानी रथ 50 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. रेजीनगर सीटवर भाजप उमेदवार 23 हजार मतांनी आघाडीवर आहे. रेजीनगमरध्ये मतमोजणीच्या चार फेऱ्या झाल्या आहेत. पुडुचेरी थट्टनचावडी विधानसभा सीटवर ऑल इंडिया NR काँग्रेसच्या अशोक आनंद यांनी विजय मिळवला आहे. त्यांना 13358 मतं मिळाली. दुसऱ्या नंबरवर काँग्रेसचे ई. विनायागम होते. त्यांना 4876 मतं मिळाली.
भाजपकडे किती मतांची आघाडी?
असमच्या नगांव लोकसभा सीटवर पोटनिवडणुकीत भाजपचे देवाशीष शर्मा विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. भाजप उमेदवाराला आतापर्यंत 1.81 लाख मतं मिळाली आहेत. दुसऱ्या नंबरवर AIUDF चे बदरूद्दीन अजमल आहेत. भाजपकडे 75 हजार मतांची आघाडी आहे.
10.56 वाजता काय स्थिती होती?
पश्चिम बंगालच्या रेजीनगर सीटवर भाजपची एकतर्फी आघाडी आहे. भाजपला 10.56 पर्यंत 11614 मतं मिळाली होती. दुसऱ्या नंबरवर काँग्रेस आहे. त्यांना 581 मतं मिळाली आहेत. भाजपला इथे 11 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी आहे.
आघाडी एकतर्फी
नंदीग्रामच्या जागेवर भाजपच्या हसीरानी रथ यांची आघाडी एकतर्फी आहे, दुसऱ्या नंबरवर काँग्रेसचे मिलन प्रधान आहेत. त्यांना आतापर्यंत 2321 मतं मिळाली आहेत. हसीरानी रथ यांना जवळपास 12 हजार मतं मिळाली आहेत.