काँग्रेसने देशाची माफी मागावी, पुलवामाबाबत पाक मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर जावडेकरांचा घणाघात

पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरींनी पुलवामा हल्ल्यात पाकचा हात असल्याचं स्वीकार केल्यानंतर जावडेकरांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

काँग्रेसने देशाची माफी मागावी, पुलवामाबाबत पाक मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर जावडेकरांचा घणाघात

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यात (Pulwama Attack) पाकिस्तानचा हात असल्याचं पाकिस्तानचेच मंत्री फवाद चौधरी (Pak Minister Favad Choudhary) यांनी कबूल केल्यानंतर त्यावरून भाजपने आता काँग्रेसला (Congress) घेरण्यास सुरुवात केली आहे. पुलवामा हल्ल्यावर संशय घेणाऱ्या काँग्रेसने आता जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Cabinet Minister Prakash Javadekar) यांनी केली आहे.

“पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या मागे त्यांचा हात असल्याचं पाकिस्तानने स्वीकारलं आहे. आता काँग्रेस आणि इतर पक्षांनी देशाची माफी मागायला हवी,” असं ट्विट प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. याच मुद्द्यावरून भाजपच्या विविध नेत्यांनीही काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसने पुलवामा हल्ल्यात षड्यंत्र असल्याचा आरोप केला होता.

‘भारताला घाबरुन अभिनंदनची सूटका’

फवाद चौधरी हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. त्यांनी संसदेत बोलताना ही कबुली दिली आहे. पाकिस्तानने भारतात घुसून हल्ला केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर, भारताकडून कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो या भीतीने भारतीय पायलट अभिनंदनला सोडण्यात आल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एका बैठकीत स्पष्ट केलं होतं, असा दावा पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे खासदार अयाज सादिक यांनी संसदेत केला होता, असंही जावडेकर यांनी सांगितलं (Cabinet Minister Prakash Javadekar).

“खासदार सादिक यांनी सांगितले की, अभिनंदनला सोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी हे भीतीने थरथर कापत होते. कारण त्यांना भारताच्या हल्ल्याची भीती वाटत होती.” त्यावर उत्तर देताना फवाद यांनी पुलवामा हल्ला पाकिस्ताननेच केल्याची कबुली दिली. पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता. पुलवामातील यश हे इम्रान खान यांच्या नेतृत्त्वातील मोठं यश होतं, असं म्हणत फवाद चौधरी यांनी त्यांचा पुलवामा हल्ल्यात हात असल्याचं स्वीकारलं होतं. भारताला निशाणा बनविणाऱ्या दहशतवाद्यांचं पाकिस्तानकडून समर्थन केलं जात असल्याचं पाकिस्तानच्या एखाद्या मंत्र्याने पहिल्यांदाच कबुली दिल्याचं भारताने म्हटलं आहे.

14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यामध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले होते. आयईडी स्फोटकांनी भरलेली कार जवानांच्या गाडीला येऊन धडकली होती, यामध्ये मोठा स्फोट होऊन 40 जवान शहीद झाले होते (Cabinet Minister Prakash Javadekar).

संबंधित बातम्या :

अशा लोकांना जोड्यानं बडवलं पाहिजे; पाकच्या कबुलीनाम्यानंतर व्ही. के. सिंह कडाडले

लडाखजवळ LAC वरुन मागे हटण्यासाठी चीनच्या दोन अटी, भारताने लगोलग धुडकावल्या

विंग कमांडर अभिनंदन यांची मुक्तता झाली नसती तर पाकिस्तानची पूर्ण ब्रिगेड उद्ध्वस्त केली असती!, भारतीय वायूसेना होती सज्ज

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *