अशा लोकांना जोड्यानं बडवलं पाहिजे; पाकच्या कबुलीनाम्यानंतर व्ही. के. सिंह कडाडले

पुलवामा हल्ला सरकारनेच घडवून आणला असेल असा आरोप करणाऱ्यांना आता भरचौकात जोड्याने बडवलं पाहिजे, असा घणाघाती हल्ला परराष्ट्र राज्य मंत्री व्ही.के. सिंह यांनी चढवला आहे.

अशा लोकांना जोड्यानं बडवलं पाहिजे; पाकच्या कबुलीनाम्यानंतर व्ही. के. सिंह कडाडले
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 1:04 PM

नवी दिल्ली: पाकिस्तानने पुलवामा हल्ला त्यांनीच केल्याची कबुली दिल्यानंतर भाजपने आता विरोधी पक्षाला घेरण्यास सुरुवात केली आहे. पुलवामा हल्ला सरकारनेच घडवून आणला असेल असा आरोप करणाऱ्यांना आता भरचौकात जोड्याने बडवलं पाहिजे, असा घणाघाती हल्ला परराष्ट्र राज्य मंत्री व्ही.के. सिंह यांनी चढवला आहे. (VK Singh On Pak’s Pulwama Admission)

पुलवामा हल्ला सरकारनेच घडवून आणला आहे, अशा वल्गना करण्यात आल्या. याच पक्षाने भगवा दहशतवादाचा उल्लेख केला होता. अशा लोकांना उघड्यावर जोड्याने बडवलं पाहिजे, असं व्ही.के. सिंह म्हणाले.

14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामामध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवाल होता. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी तर या हल्ल्यामागे मोदी सरकारचा हात असल्याचा आरोप केला होता. निवडणुका जिंकण्यासाठी मोदी सरकारने हा हल्ला घडवून आणला असल्यचा आरोपही त्यांनी केला होता. तसेच बालकोट हल्ल्याच्या पुराव्याची चौकशी करण्यासाठी आणि या हल्ल्याची माहिती मिळावी म्हणून एका संयुक्त राष्ट्र समितीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.

पाकिस्तानची कबुली

दरम्यान, पाकिस्तान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी पाकिस्तानी संसदेत भारतात झालेल्या पुलवामा हल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे कबूल केले आहे. पुलवामा हल्ला हे पंतप्रधान इमरान खान यांच्या नेतृत्वातील सरकारचे यश असल्याचे चौधरींनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये म्हटले होते. पाकिस्तानला पंतप्रधान इमरान खान यांच्याबद्दल आदर असला पाहिजे कारण आपल्या देशाने भारताच्या भागात घुसून त्यांच्यावर हल्ला केला आहे, असं फवाद चौधरी या मंत्र्याने म्हटले आहे. पाकच्या नॅशनल असेंब्लीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे 14 फेब्रुवारी 2019 रोजी भारतातील सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले. पाकिस्तानी मुस्लीम लीगच्या सादिक खान यांनी कॅप्टन अभिनंदन यांच्या सुटकेबद्दल केलेल्या वक्तव्याला फवाद खान उत्तर देत होते.

संबंधित बातम्या:

पाकिस्तानकडून पुलवामा हल्ल्याची कबुली, इम्रान खानच्या मंत्र्याने पाकला उघडं पाडलं

Breaking | पुलवामाच्या काकापोरा भागात सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Jammu Kashmir| पुलवामात पुनरावृत्ती टळली, तब्बल 20 किलो आयईडी भरलेली कार निकामी, सुरक्षा यंत्रणेला मोठं यश

(VK Singh On Pak’s Pulwama Admission)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.