
भारतीय संस्कृतीत जावई आणि सासऱ्याचे नाते नेहमीच वडील आणि मुलासारखे मानले जाते. हे नाते केवळ सामाजिक नव्हे तर कायदेशीर मान्यताप्राप्त देखील आहे. सासऱ्याच्या संपत्तीत जावयाला वाटा मिळू शकतो का ? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जर एखाद्या जावयाने सासऱ्याच्या संपत्तीत वाटा मागितला तर काय होईल ? देशात अनेकदा सासरेबुवा आणि जावयात संपत्तीवरुन वाद झाल्याची प्रकरणे घडली आहेत. चला तर या संदर्भतात भारताचा कायदा काय म्हणतो ?
भारतीय वारसा कायद्यानुसार जावयाचा सासऱ्याच्या संपत्तीत थेट कोणताही वाटा असत नाही आणि हा कायदाही सर्व धर्मांना लागू होतो. मग तो हिंदू असो की मुस्लीम वा शीख-ख्रिश्चन सर्व धर्मात याबाबत जावई संपत्तीचा कायदेशीर वारस नाही हे स्पष्ट केले आहे.
भारतीय वारसा कायद्यात वैध वारसदारांना क्लास-1 आणि क्लास -2 अशा यादीत विभागले आहे. क्लास -1 मध्ये व्यक्तीच्या जवळचे लोक सामील असतात. उदा. पत्नी, मुलगा, मुलगी आदी. तर क्लास – 2 मध्ये दूरचे नातेवाईक असतात. परंतू या दोन्ही यादीत जावायाच्या नावाचा समावेश नसतो.
जर पत्नी तिच्या वडीलांच्या संपत्तीची वारसदार असेल आणि तिला संपत्ती मिळाली तर पत्नीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष रुपाने पतीचा या संपत्तीवर अधिकार होऊ शकतो. ही वडीलोपार्जित संपत्ती विशेष रुपाने जेथे मुलीला पित्याचा वैध वारसदार म्हणून संपत्ती दिली आहे तेथेच हे घडते. एकदा का मुलीला संपत्ती वारसा म्हणून मिळाली की जावई तिचा जीवनसाथी म्हणून त्या संपत्तीचा लाभ घेऊ शकतो. परंतू स्वत:च्या पात्रतेने नाही !
जर सासऱ्याने आपले इच्छापत्र विशेष रुपाने जावयाच्या नावाने लिहिले असेल तर त्यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचा कायदेशीर अधिकारी जावई होऊ शकतो.
: कोणताही व्यक्ती त्याची मुलगी आणि जावयाला भेट म्हणून प्रॉपर्टी देऊ शकतो. त्या प्रॉपर्टीला ‘गिफ्ट डीड’ म्हणून रजिस्टर करणे गरजेचे असते. म्हणजे ती कायदेशीर रुपाने जावयाच्या नावे करता येते.
मुस्लीमाच्या प्रकरणात उत्तराधिकारी इस्लामी शरिया कायद्यांर्गत निश्चित होतो. शरीयतनुसार सासरा संपत्तीत केवळ 1/3 वाटा इच्छापत्राद्वारे कोणा गैर-वारसदाराला (उदा. जावई ) देऊ शकतो. तसेच ख्रिश्चन धर्मातही हिंदू धर्माप्रमाणे जावयाचा कोणताही हक्क नसतो. केवळ पत्नीच्या वाट्याला आलेली संपत्ती आणि गिफ्टमध्ये मिळालेल्या प्रॉपर्टीवर जावई हक्क सांगू शकतो.