
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधात प्रचंड तणाव आहे. फक्त भारतातूनच नाही, जगात जिथे कुठे भारतीय वास्तव्याला आहेत, त्यांची एकच मागणी आहे, पहलगाम हल्ल्याचा बदला घ्या. सध्याच्या घडीला, पाकिस्तानला भारताचा पुढचा वार काय असेल? याचीच भिती आहे. एक ट्रेलर म्हणून भारताने तात्काळ Action घेत डिप्लोमॅटिक स्ट्राइक केला होता. या अंतर्गत भारताने सिंधू जल करार स्थगित केला. यामुळे गडबडलेल्या पाकिस्तानकडून थेट युद्धाची धमकी देण्यात आली. अलीकडेच बिलावल भुट्टो यांनी सिंधू जल करारावरुन रक्त वाहणार अशी धमकीची भाषा केली. म्हणा अशा पोकळ धमक्यांशी पाकिस्तानच जुनं नातं आहे.
आता प्रश्न हा निर्माण होतो की, भारताने पाकिस्तान विरुद्ध कुठली मोठी Action घेतली किंवा शत्रू देशावर कुठला स्ट्राइक केला, तर पाकिस्तान पलटवार करेल का?. एका शब्दात या प्रश्नाच उत्तर आहे, नाही. आता ते का पलटवार करु शकणार नाहीत? हे खाली दिलेल्या चार पॉइंटमधून समजून घेऊया. या पॉइंट्समधून पाकिस्तानची हतबलता दिसून येते.
पाकिस्तानची हतबलता काय?
पाकिस्तान पलटवार त्याचवेळी करु शकतो, जेव्हा त्यांना कुठल्या सुपरपावरची साथ मिळेल. सध्या सगळ्या देशांचा स्टँड क्लियर आहे. सध्या पाकिस्तान ज्या देशाच्या मांडीवर बसला आहे, त्यांनी सुद्धा पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे. चीनने क्लियर केलय की, ते युद्धाच समर्थन करणार नाहीत. यावरुन एक गोष्ट स्पष्ट आहे, उद्या युद्ध झाल्यास त्यांना चीनकडून मोठं समर्थन मिळणार नाही. दुसऱ्याबाजूला शहबाज ज्यांच्या इशाऱ्यावर नाचतात ते जिनपिंग यांना स्वत:ला भारतासोबत मजबूत संबंध हवे आहेत. काही दिवसांपूर्वी चीनने भारताच्या राष्ट्रपतींना एक लेटर पाठवलं होतं. त्यात लिहिलेलं की, चीनला भारताची साथ हवी आहे. त्यामुळे ड्रॅगन पाकिस्तानाच समर्थन करण्याआधी हजारवेळा विचार करेल एवढं मात्र नक्की.
फक्त टर्की असा एकमेव देश आहे, ज्यांनी पाकिस्तानला मृत्यूच सामना पाठवलय. पण टर्की इतका मोठा देश नाहीय, सुपरपावर नाहीय. त्यांच्या सपोर्टमुळे पाकिस्तानचा निश्चितच खूप मोठा फायदा होणार नाही. सुपरपावर देशांच बोलायच झाल्यास रशिया खुलेआम भारताच समर्थन करतो. अमेरिका भारताविरुद्ध जाण्याची हिम्मत करणार नाही. ब्रिटनही पाकिस्तानला साथ देणार नाही. अशावेळी भारताच्या जवानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना जन्नतमध्ये पोहोचवलं, तर कुठलाही देश भारताच्याविरोधात जाण्याची शक्यता नाही.
दुसरा पॉइंट
पाकिस्तानने स्वत:च्या डोक्यावर असलेलं कर्ज पहाव. इकोनॉमी ते महागाईपर्यंत त्यांनी नजर टाकावी. शहबाज यांनी स्वत:च्या मनाला प्रश्न विचारावा खरच आपला देश युद्ध लढण्याच्या स्थितीत आहे का?. युद्धाआधीच महागाईने पाकिस्तानच कबंरड मोडलं आहे. अशा स्थितीत ते युद्धाबद्दल कसा विचार करु शकतात?. अलीकडेच एक पाकिस्तानी खासदार संसदेत म्हणालेला की, भारताबरोबर युद्ध करण्यात आपला पराभव आहे. या युद्धामुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्था अजून मागे जाईल.
तिसरा पॉइंट
बलूचिस्तान आणि खैबर-पख्तूनखवा या प्रांतातील जनतेच्या मनात पाकिस्तानी लष्कराबद्दल भरपूर असंतोष आहे. पाकिस्तानी सैन्याकडे असलेली शस्त्र सुद्धा त्यांची पोलखोल करण्यासाठी पुरेशी आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने आपली फायटर विमानं युद्धाभ्यासासाठी म्यानमारला पाठवली होती. म्यानमारने JF16 ला भंगार ठरवून ती विमान परत पाठवून दिली. त्याशिवाय चीनकडून विकत घेतलेली एअर डिफेन्स सिस्टिमही खराब अवस्थेत आहे. अशी शस्त्र सामुग्री असेल, तर कुठलं सैन्य कसं लढू शकतं?
चौथा पॉइंट
रविवारी रात्री पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी उमरा निवास येथे मोठे बंधु आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली. यावेळी शहबाज शरीफ यांनी सध्याची स्थिती नवाज यांना सांगितली. भारत पाकिस्तानवर दबाव टाकून कशा प्रकारची Action घेतोय, त्याची माहिती दिली. त्यावर नवाज शरीफ यांनी शहबाज शरीफ यांना संयम बाळगण्याच आवाहन केलय. शांत राहण्यात पाकिस्तानच हित आहे असं नवाज म्हणाले. परिस्थिती अधिक चिघळू नये, यासाठी मंत्री आणि नेत्यांना उलट-सुलट वक्तव्य करण्यापासून रोखण्याचा सल्ला शहबाज यांना दिला. नवाज यांनी शहबाज शरीफ यांना कुटनितीने विषय सोडवण्याचा सल्ला दिला. भारत आणि पाकिस्तान दोन्ही अणवस्त्र संपन्न देश आहेत, म्हणून संघर्षाऐवजी शांततेचा मार्ग फायद्याचा राहील असं शहबाज शरीफ यांचं मत आहे.