केंद्र जातीनिहाय जनगणना करणार, पण राहुल गांधीनी विचारले 3 गंभीर प्रश्न; सरकारला घेरलं!

काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला याच विषयावर घेरलं आहे. त्यांनी जातीनिहाय जनगणनेविषयी केंद्राला तीन गंभीर आणि महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत.

केंद्र जातीनिहाय जनगणना करणार, पण राहुल गांधीनी विचारले 3 गंभीर प्रश्न; सरकारला घेरलं!
rahul gandhi narendra modi
| Updated on: Apr 30, 2025 | 7:52 PM

Rahul Gandhi On Caste Census : केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. या निर्णयामुळे देशात कोणत्या समाजाचे किती प्रतिनिधीत्व आहे, हे समजू शकणार आहे. मात्र काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला याच विषयावर घेरलं आहे. त्यांनी जातीनिहाय जनगणनेविषयी केंद्राला तीन गंभीर आणि महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत.

राहुल गांधी यांनी विचारले तीन प्रश्न

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयावर काँग्रेसची भूमिका मांडली. त्यांनी सरकारच्या याचा थेट विरोध केला नसला तरी तीन मूलभूत प्रश्न विचारले आहेत. सरकारने या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, अशी अप्रत्यक्ष मागणीच त्यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी नेमके कोणते प्रश्न विचारले?

पत्रकाराच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, संभ्रम निर्माण करण्याचे माझे काम नाही. मी ठोस माहितीच्या आधारावर बोलतो. संभ्रम निर्माण करण्यात मला रस नाही. त्यांनी हा निर्णय आताच का घेतला? यातही मला काही रस नाही. सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. मला फक्त जातीनिहाय जनगणना कधी होणार? जातीनिहाय जनगणना कशा प्रकारे केली जाईल? या जनगणनेत कोणत्या प्रकारचे प्रश्न असतील? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

आम्ही तेलंगणात लाखो लोकांचे सल्ले घेतले

तसेच, आम्ही जातीनिहाय जनगणना केली, असं सरकार म्हणू शकतं. पण तुम्ही या जनगणनेत योग्य ते प्रश्नच विचारले नाही तर या जनगणनेचा काहीही फायदा नाही, असेही त्यांनी सांगितले. तेलंगाणा राज्यात जनगणना करण्याआधी आम्ही लाखो लोकांकडून सल्ला घेतला. आम्हाला लोकांची जातीनिहाय जनगणना हवी आहे. आम्हाला अधिकाऱ्यांची जनगणना नको आहे, अशीही भूमिका त्यांनी मांडली.