
नवी दिल्ली | 22 फेब्रुवारी 2024 : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. मलिक हे रुग्णालयात दाखल असतानाच सीबीआयने ३० ठिकाणी छापे मारत ही कारवाई केली. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, या छाप्यांमुळे मी घाबरणार नाही असे सांगत मलिक यांनी ट्विट केले. मी गेल्या ३-४ दिवसांपासून आजारी असून रुग्णालयात दाखल आहे. असे असतानाही माझ्या घरावर छापे टाकले जात आहेत. माझ्याकडे ( घरात) 4-5 कुर्ते आणि पायजम्याशिवाय काहीही मिळणार नाही, असे सांगत त्यांनी या छाप्यांमुळे आपण घाबरणार नसल्याचे स्पष्ट केले. किरू हायड्रो प्रोजेक्टशी प्रकरणी मलिक यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. यापूर्वी सीबीआयने विमा घोटाळ्याप्रकरणी मलिक यांच्यावर कारवाई केली होती. याआधीही सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील सत्यपाल मलिक आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकले होते.
हे छापे टाकून माझा ड्रायव्हर आणि माझ्या सहाय्यकालाही नाहक त्रास दिला जात आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी या छाप्यांना घाबरणार नाही. मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे मलिक म्हणाले. सीबीआयच्या पथकाने मलिक यांच्या घरासह अन्य 30 ठिकाणी देखील छापे मारत कारवाई केली.
मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, घाबरणार नाही, झुकणार नाही
जे भ्रष्टाचारात सहभागी आहेत, अशी ज्यांच्याबद्दल मी तक्रार केली होती त्यांची चौकशी करण्याऐवजी माझ्या निवासस्थानावर सीबीआयने छापे टाकले. माझ्याकडे 4-5 कुर्ते आणि पायजमे यांच्याशिवाय काहीही सापडणार नाही. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून हुकूमशहा मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी घाबरणार नाही आणि झुकणार नाही, असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं.
पिछले 3-4 दिनों से मैं बिमार हूं ओर हस्पताल में भर्ती हूं। जिसके वावजूद मेरे मकान में तानाशाह द्वारा सरकारी एजेंसियों से छापे डलवाएं जा रहें हैं। मेरे ड्राईवर, मेरे साहयक के ऊपर भी छापे मारकर उनको बेवजह परेशान किया जा रहा है।
में किसान का बेटा हूं, इन छापों से घबराऊंगा नहीं। में…— Satyapal Malik 🇮🇳 (@SatyapalmalikG) February 22, 2024
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, किश्तवाडमधील किरू जलविद्युत प्रकल्पासाठी 2,200 कोटी रुपयांचे नागरी कामाचे कंत्राट देण्यात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 2019 मध्ये हा छापा टाकण्यात आला होता. 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 या कालावधीत जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असलेले मलिक यांनी या प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्स मिटवण्यासाठी 300 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला होता.
सीबीआयने दाखल केली होती FIR
मलिक यांनी लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात सीबीआयने एक एफआयआर दाखल केली होती. चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स पॉवर लिमिटेडचे माजी अध्यक्ष नवीन कुमार चौधरी आणि इतर माजी अधिकारी एमएस बाबू, एमके मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा आणि पटेल यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.
कीरू हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे तरी काय ?
कीरू हायइड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट हा जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदी वर प्रस्तावित आहे. मोदी सरकारच्या कॅबिनेटने 2019 साली चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडला या प्रोजेक्टसाठी गुंतवणुकीची परवानगी दिली होती. त्याचे काम अजून सुरू असून हा प्रोजेक्ट 2025 साली पूर्ण होईल असा अंदाज आहे.