AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संघाचे शताब्दी वर्ष, सहा कलमी कार्यक्रम जाहीर, विजयादशमीला देशभर व्यापक मोहीम सुरु होणार

संघाचे शताब्दी वर्षे साजरे होत आहे त्यानिमित्ताने संघाने कर्नाटकातील बंगळुरु येथील बैठकीत आपला सहा कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे.

संघाचे शताब्दी वर्ष, सहा कलमी कार्यक्रम जाहीर, विजयादशमीला देशभर व्यापक मोहीम सुरु होणार
Expansion and strengthening of union work, social unity and the goal of national renaissance
Follow us
| Updated on: Mar 23, 2025 | 7:16 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी बैठक बंगळुरु येथे पार पडली. या तीन दिवसांच्या शिबिरानंतर प्रसाध्यमांशी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह कार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी संघाची वाटचाल आणि भविष्यातील ध्येयांविषयी माहीती दिली आहे. या वेळी ते म्हणाले की स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनातील त्यांच्या योगदानाविषयी माहीती देत त्यांना त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

महिला स्वातंत्र्य सेनानी महाराणी अबक्का यांच्या जन्माच्या ५०० व्या जन्मतिथी निमित्त सह कार्यवाह होसबाळे यांनी महाराणी अब्बक्का यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्या कुशल प्रशासक आणि निडर योद्धा होत्या. राणी अबक्का यांनी त्यांच्या छोटे राज्य उल्लाल ( दक्षिण कन्नड, कर्नाटक ) येथून पोर्तुगिजांशी लढा दिला होता असेही ते म्हणाले. राणी अबक्का यांचा योग्य सन्मान करताना भारत सरकारने त्यांचे साल २००३ रोजी पोस्टाचे विशेष तिकीट जारी केले होते. साल २००९ मध्ये त्यांनी एका गस्ती नौकेला त्यांचे नाव दिल्याचे स्मरण यावेळी त्यांनी केले. राष्ट्रनिर्माणातील त्यांचे योगदान, साहस तसेच नेतृत्व यांकडून प्रेरणा घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

संघ यंदाच्या विजयागदशमीला आपले १०० वर्षे पूर्ण करीत आहे. येणारे वर्षे संघ कार्याचा विस्तार तसेच मजबूतीकरणाचे ध्येय्य आहे. संघाचा उद्देश्य केवळ उत्सह साजरा करण्याचा नाही तर आत्मचिंतन करणे, संघ कार्यसाठी समाजाने दिलेल्या पाठींब्याबद्दल आभार प्रकट करणे आणि ३ ) राष्ट्र तसेच समाजाला एकसंघ करण्यासाठी स्वत:ला पुन्हा समर्पित करण्याचे ध्येय्य असल्याचे होसबाळे यांनी यावेळी सांगितले.

हे सुद्धा वाचा

या प्रतिनिधी सभेत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारा संदर्भात आवाज उठविणारा ठराव मंजूर केला आहे, संघाला १०० वर्षे पूर्ण होताना हा ठराव मंजूर झाला आहे. सहकार्यवाह म्हणाले की डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना करताना जसे म्हटले होते की संघा काही नवीन कार्य सुरु करीत नाही तर अनेक शतकांपासून चालू असलेल्या कार्याला पुढे नेत आहे.

संघ शताब्दी : विजयादशमीला खालील कार्यक्रमांवर संघाचे लक्ष्य केंद्रित असणार आहे.

1. शताब्दी वर्षाची सुरुवात विजयादशमी २०२५ च्या निमित्ताने होणार असून यावेळी गणवेशातील स्वयंसेवक संघ आपआपल्या मंडळ,खंड,नगर स्तरावर कार्यक्रम आयोजित करतील. दरवर्षी प्रमाणे यंदाही सरसंघचालक स्वयंसेवकांना संबोधित करतील.

2. नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत तीन आठवडे मोठ्या स्तरावर घरोघरी संपर्क मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्याचे नाव “हर गांव, हर बस्ती, घर-घर” असे आहे. या दरम्यान संघाचे साहित्य वितरण केले जाणार असून स्थानिक शाखांद्वारा कार्यक्रम आयोजित केले जातील.

3. सर्व मंडळे आणि वस्त्यांमध्ये हिंदू संमेलन आयोजित केली जातील.कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येकाच्या जीवनात एकता आणि सद्भभाव,राष्ट्राच्या विकासात सर्वांचे योगदान आणि पंच परिवर्तनात प्रत्येक व्यक्तींनी सहभाग घ्यावा असा संदेश दिला जाईल.

4. खंड- शहर स्तरावर सामाजिक सद्भभाव बैठकांचे आयोजन केले जाईल. ज्यात एकत्र येऊन रहाण्यावर जोर दिला जाणार आहे. या बैठकांचा उद्देश्य सांस्कृतिक आधार आणि हिंदू चरित्राला न विसरता आधुनिक जीवन जगण्याचा संदेश दिला जाईल.त्यांनी यावेळी महाकुंभचे उदाहरण दिले, जेथे सर्व क्षेत्रातील लोक एकत्र आले होते.

5. सह कार्यवाह दत्तात्रय  होसबाळे यांनी सांगितले की जिल्हा स्तरावर प्रमुख नागरिक संवाद आयोजित केले जातील. या कार्यक्रमात राष्ट्रीय विषयांवर योग्य तथ्य आणि प्रचलीत चुकीचे समज दूर करण्यावर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे.

6. युवकांसाठी विशेष कार्यक्रम प्रांतांद्वारा आयोजित केले जातील. १५ ते ३० वयोगटातील तरुणांसाठी राष्ट्र उभारणी, सेवा उपक्रम आणि पंच परिवर्तन यावर लक्ष केंद्रित करणारे कार्यक्रम आयोजित केले जातील. स्थानिक मंडळांद्वारा आवश्यकेते नुसार कार्यक्रमाची योजना तयार केली जाईल.

वक्फ बाबत काय म्हणाले ?

हिंदू संघटनांनी वक्फ कायद्याला रद्द करण्याची मागणी केली आहे या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की वक्फद्वारे जमीनीवर अतिक्रमण झाल्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त आहेत. सरकार यावर तोडगा काढायचे काम करीत आहे. जे चुकीचे आहे ते दूर केले जाणार आहे.

मानसिक वसाहतवादाला समाप्त करणे गरजेचे –

औरंगजेब संदर्भातील वादावर ते म्हणाले की जे समाज आणि राष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिक आहेत.तेच आमचे आदर्श असावेत. असहिष्णुतेसाठी ओळखले जाणारे आपल्या राष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत नाहीत. औरंगजेब सारख्या लोकांचा विरोध धार्मिक नाही तर राष्ट्र आणि त्याच्या एकतेच्या बाजूने आहे. आपल्या १९४७ मध्ये राजकीय स्वातंत्र्य मिळाले, परंतू परंतू मानसिक वसाहतवाद आज देखील एक वास्तव आहे.आणि या मानसिक वसाहतवादाला समाप्त करणे गरजेचे आहे.

धर्माच्या आधारावर दिलेले आरक्षणा संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की न्यायालयांनी अनेकवेळा सरकारच्या अशा तरतूदी घटनाबाह्य असल्याचे सांगत फेटाळल्या आहेत. अशा प्रकारे राजकीय पाऊले उचलणारा कोणताही व्यक्ती घटना निर्माण करणाऱ्यांच्या  उद्देश्यांच्याविरोधात जात आहे.

मणिपूरच्या लोकांचे जीवन सामान्य होईल

वर्तमान राष्ट्रीय परिदृश्य विशेष करुन मणिपूरच्या स्थिती बाबत ते म्हणाले की सरकारने त्यांच्या आकलनानुसार काही पावले उचलली आहेत. आणि संघाने यावर केवळ असे उपाय करायला हवेत ज्याने या समस्येचे उत्तर मिळेल आणि मणिपूरच्या लोकांचे जीवन सामान्य होईल असे ते म्हणाले.

हिंदू समाजाचे पुनर्जागरण करणे

संघाचा १०० वर्षांच्या प्रवास आणि भविष्यातील उद्दिष्टाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, सरचिटणीस म्हणाले की, संघाचे उद्दिष्ट हिंदू समाजाचे पुनर्जागरण करणे, हिंदू समाजाचे संघटन करणे आहे. अस्पृश्यतासारख्या अनेक उपजत वाईट गोष्टींमुळे हे एक कठीण काम होते. संघ आपल्या शाखा आणि देशव्यापी उपक्रमांद्वारे हे ध्येय साध्य करण्यासाठी सतत कार्यरत आहे. ज्यामुळे एक सामंजस्यपूर्ण समाज आणि राष्ट्रासाठी सर्वांना एकत्र आणत आहे.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.