
देशात सर्वात जास्त ( दारू) कोण पितं ? असे प्रश्न तुमच्या डोक्यातही येत असतील. देशात महिला आणि पुरूषांपैकी सर्वात जास्त मद्यसेवन कोण करतं, हे जाणून घेऊया. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने एक सर्वेक्षण केले असून त्यात आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत. हा सर्व्हे अतिशय मनोरंजक आहे, ज्याची सध्या बरीच चर्चा होत आहे.
देशातील कोणत्या राज्यात दारूचे सर्वाधिक सेवन केलं जातं ? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? कोणत्या राज्यात पुरूष किंवा महिला सर्वाधिक दारू पितात? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. अशा सर्व प्रश्नांची उत्तरं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या एका सर्व्हे रिपोर्टमधून समोर आली आहेत. त्यामध्ये अतिशय हैराण करणारा खुलासा झाला आहे. या सर्वेक्षणात ईशान्येकडील राज्ये यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. सर्वेक्षणानुसार, ईशान्य भागातील महिला सर्वाधिक (मद्य) सेवन करतात.
महिलांच्या मद्यसेवनात कोणतं राज्य प्रथम स्थानी ?
या सर्व्हेनुसार, आसाममध्ये महिलांचे दारू पिण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. देशभरात 15 ते 49 वर्षे वयोगटातील दारू पिणाऱ्या महिलांपैकी केवळ 1.2 टक्के महिला आहेत. त्याच वेळी, आसाममध्ये हा आकडा अनेक पटींनी वाढलेला दिसतो. सर्वेक्षणानुसार, येथे 16.5 टक्के महिला दारूचे सेवन करतात, ज्यामुळे हे राज्य देशातील इतर राज्यांच्या यादीत वरच्या स्थानावर आहे. तर आसामनंतर मेघालय दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 8.7 टक्के महिला दारू पितात.
कोणत्या राज्यात पुरूष पितात सर्वाधिक दारू ?
यासोबतच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण सर्वेक्षणानुसार, महिलांच्या मद्यसेवनाच्या बाबतीत अरुणाचल प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 3.3 टक्के महिला दारूचे सेवन करत असल्याची माहिती समोर आली आहे. सिक्कीम आणि छत्तीसगड चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत, जिथे 0.3 आणि 0.2 टक्के महिला दारू पितात. कोणत्या राज्यात सर्वाधिक पुरुष दारू पितात हे देखील या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून बरीच रंजक माहिती समोर आली आहे. त्यानुसार अरुणाचल प्रदेशात पुरुष सर्वाधिक दारू पितात. येथे 15 ते 49 वयोगटातील 59 टक्के पुरुष दारूचे सेवन करतात.