एमएमएस कांड भोवलं, ‘त्या’ तिघांना रिमांड; काळेधंदे होणार उघड?

| Updated on: Sep 19, 2022 | 6:31 PM

पंजाबमधील एमएमएस प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे, या प्रकरणातील एका मुलीसह दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एमएमएस कांड भोवलं, त्या तिघांना रिमांड; काळेधंदे होणार उघड?
Follow us on

चंदीगडः चंदीगडमधील खासगी विद्यापीठातील एमएमएस (MMS Viral) प्रकरणातील तीन आरोपींना मोहाली न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी (Police custody) सुनावली आहे. मात्र चंदीगड पोलिसांनी आणखी काही दिवसांची कोठडीची मागणी केली होती. याप्रकरणी आणखी काही माहिती घ्यायची असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, यामधील आरोपी हा एमबीए विद्यार्थी असून तो तिचा प्रियकर आणि तिच्या एका मित्राला पंजाब पोलिसांनी (Panjab Police) ताब्यात घेऊन मोहाली कोर्टात हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाकडून या सर्व आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे प्रकरण आता अधिक तापले असून गेल्या सहा दिवसांपासून हे विद्यापीठ बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थीही आपापल्या घरी निघून गेले आहेत.

हे प्रकरण आता प्रचंड तापले असून एमएमएसचा तपास करण्यासाठी पोलिसांकडूनही स्वतंत्र तपास पथकं तयार केली गेली आहेत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असं जाहीर आवाहनही केले आहे.

चंदीगडमधील या विद्यापीठातील एमएमएसविषयी वेगवेगळी मतं मांडली जात आहेत. जो एमएमएस व्हायरल झाला आहे. तो फक्त एका विद्यार्थिनीचा आहे की, अनेक जणींचा आहे, यावरुन आता नवीन वाद उफाळून येत आहे.

यामध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, हा एमएमएस फक्त एकाच विद्यार्थिनीचा आहे, की 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल केले गेले ही अफवा असल्याचे म्हटले आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी गुरप्रीत देव यांनी याविषयी बोलताना सांगितले की, आरोपी विद्यार्थिनीने तिचा स्वतःचाच व्हिडिओ शेअर केला होता हे खरं असले तरी तिच्याकडे अजून तरी इतर कोणत्याही विद्यार्थिनीचा व्हिडीओ सापडला नाही. मात्र विद्यार्थिनी आणि विद्यार्थी संघटनेने मात्र 60 हून अधिक विद्यार्थिनींचा व्हिडीओ व्हायरल केला गेला आहे.