AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपच्या नेत्याचा थेट दहशतवाद्यांबरोबर संबंध; ‘डी’गँगबरोबरही हात मिळवणी; भाजपचा हल्लाबोल

दिल्ली वक्फ बोर्डातील कर्मचारी भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमानतुल्ला खान यांच्या 'लाल डायरी'ची आता चर्चा होऊ लागली आहे.

आपच्या नेत्याचा थेट दहशतवाद्यांबरोबर संबंध; 'डी'गँगबरोबरही हात मिळवणी; भाजपचा हल्लाबोल
| Updated on: Sep 19, 2022 | 5:42 PM
Share

 नवी दिल्लीः दिल्ली वक्फ बोर्डातील कर्मचारी भरती घोटाळ्याप्रकरणी (Delhi Waqf Board Recruitment Scam) अटक करण्यात आलेल्या अमानतुल्ला खान यांची ‘लाल डायरी’ सध्या जोरदार चर्चेत आली आहे. ज्यावेळी अमानतुल्ला यांच्या जवळच्या साथीदारांच्या काही ठिकाणी एसीबीकडून (ACB) धाड टाकण्यात आली. त्यानंतर एसबीला या प्रकरणात एक लाल डायरी सापडली आहे. त्यामध्ये आमदार आणि वक्फ बोर्ड अध्यक्षांची अनेक गुपितं असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणावरुन भाजपकडूनही जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

या डायरीमध्ये अनेक दोन नंबरच्या धंद्यापासून दहशतवाद आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची त्यात माहिती असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

भाजपच्या आदेश गुप्ता यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की अमानतुल्ला खान यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर मोठी रोख रक्कम सापडली आहे. त्याच घरात शस्त्रं आणि जीवंत काडतुसेही सापडल्याचा आरोप केला आहे. ही धाड टाकल्यानंतर यामध्ये महत्वाची एक लाल डायरीही सापडली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे मानले गेलेले आमदार अमानतुल्ला खान यांचे दहशतवाद्यांबरोबर संबंध असल्याचा आरोप केला गेला आहे. तसेच त्यांचे अंडरवर्ल्डशीही संबंध असल्याचा आरोपही त्यांच्यावर केला गेला आहे. मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

अमानतुल्ला खान यांच्याजवळचे कौसर इमाम सिद्दीकी यांच्याही घरावर एसीबीचे छापे पडले आहेत. त्यावेळी त्यांच्याही घरातून शस्त्रं आणि रोख रक्कम ताब्यात घेऊन त्यांच्या घरातूनही डायरी ताब्यात घेतली आहे.

मात्र छाप टाकल्यापासून कौसर फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. इतका पैसे कोठून आला आणि किती पैसे आहेत याची सर्व माहिती त्या लाल डायरीत असल्याचे म्हटले आहे.

अमानतुल्ला यांच्या घरावर धाड टाकल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय हमीद अली यांच्याही घरावर धाड टाकण्यात आली. त्यावेळी हमीदच्या घरातून एक विनापरवाना विदेशी पिस्तूल आणि 12 लाख रोख रक्कम ताब्यात घेतली गेली. आपने मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.