चंदीगड एमएमएस प्रकरणातील चौथा आरोपीचं स्टेटस बघून पोलीस चक्रावले….

| Updated on: Sep 26, 2022 | 9:17 PM

विद्यार्थिनीने त्याला रंकज वर्माच्या फोटोसह त्याचा मोबाईल नंबर त्याला दिला होता. त्यामुळे आता मुलीसंबंधित ज्या ज्या व्यक्ती होत्या त्या आता सगळ्याच अडचणीत आल्या आहेत.

चंदीगड एमएमएस प्रकरणातील चौथा आरोपीचं स्टेटस बघून पोलीस चक्रावले....
Follow us on

मोहालीः चंदीगड एमएमएस (Chandigarh MMS) प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असल्याने अनेक धक्कादायक माहितीही समोर येत आहे. या प्रकरणात यापूर्वी तिघा जणांना अटक केली गेली होती. तर चौथा संशयित हा लष्करी जवान असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मात्र पोलिसांना धक्काच बसला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. पंजाब (Panjab) पोलिसांनी सैनिक (Indian Army) असलेल्या आरोपी संजीव सिंग याला अरुणाचल प्रदेशातील सेला पासमधून ताब्यात घेऊन अटक केली आहे.

सैनिक संजीव हा आरोपी असलेल्या तरुणीचा प्रियकर असून त्याला वसतिगृहातील मुली अंघोळ करतानाचे व्हिडीओ पाठवले असल्याची माहिती आता उघड झाली आहे. ही गोष्ट त्याने पोलिसानाच सांगितली आहे.

लष्करातील जवान संजीवला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने व्हिडीओ पाठवणाऱ्या मुलीबद्दल आणि संबंधाबद्दल पोलिसांसमोर खुलासा केला आहे. आरोपी तरुणी आणि त्याची भेट सोशल मीडियाच्या मदतीनेच झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी हे ही सांगितले की, या दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले होते मात्र, आरोपी तरुणी संजीवसोबत व्हिडीओ शेअर करत होती की नाही हे मात्र अजून समजू शकले नाही.

या दोघांनी मोबाईलवरुन एकमेकांना काय शेअर केले आहे ते तपासण्यासाठी आता सैनिक संजीवचा मोबाईलही ताब्यात घेतला आहे.

आरोपी तरुणी एमबीएची विद्यार्थिनी असून तिच्यासंदर्भात वसतिगृह व्यवस्थापकाकडे चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी ती सतत कोणाला तरी ती मेसेज करत होती असं समजलं.

त्यानंतर ती संजीवसोबत गप्पा मारत असल्याचेही उघड झाले. संजीव आणि आरोपी तरुणीचे चॅट तपासल्यानंतर आर्मी मॅन संजीव आरोपी तरुणीला व्हिडिओसाठी जबरदस्ती करत होता.

त्यावेळी विद्यार्थिनीने त्याला रंकज वर्माच्या फोटोसह त्याचा मोबाईल नंबर त्याला दिला होता. त्यामुळे आता मुलीसंबंधित ज्या ज्या व्यक्ती होत्या त्या आता सगळ्याच अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणातील आणखी एक आरोपी तो म्हणजे रंकज वर्मा. त्याने आता जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचे तो सांगत आहे. तो आरोपी तरुणी आणि शिमल्यात राहणाऱ्या सनी मेहतालाही ओळखत नसल्याचे त्याने सांगितले आहे.