Chandrayaan 3 | चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील फोटो पहिल्यांदा समोर, पाहा

Isro Share Moon South Pole Photo | इस्त्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Chandrayaan 3 | चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील फोटो पहिल्यांदा समोर, पाहा
| Updated on: Aug 23, 2023 | 9:22 PM

मुंबई | भारताची चांद्रयान 3 मोहीम फत्ते झाली आहे. चांद्रयान-3’ची मोहीम यशस्वी झाली. भारताचं चांद्रयान 3 हे दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या पोहचलं. “मी चंद्रावर पोहचलो आणि तुम्हीही” असा मेसेज चांद्रयानाने इस्त्रोला पाठवला. इस्त्रोच्या या मोहिमेमुळे प्रत्येक भारतीयाची छाती ही अभिमानने फुलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीचं कौतुक केलं. मोदी यांनी इस्त्रोचे चेयरमन सोमनाथ यांना कॉल करुन अभिनंदन केलं. आता इस्त्रोने चंद्राचे काही फोटो ट्विट केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चंद्राचे फोटो कसे आहेत, हे पाहण्यासाठी सर्वसामांन्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण दिसून येत आहे. अनेक जण आपल्या मित्रांसोबत चंद्राचे फोटो शेअर करत आहेत.

इस्त्रोने एकूण 4 फोटो ट्विट केले आहेत. चांद्रयाण 3 हे चंद्रावर उतरत असताना लँडरच्या कॅमेऱ्याने हे फोटो काढण्यात आले आहेत. चांद्रयाण 3 लँडर आणि इस्त्रोचं संपर्क व्यवस्थित सुरु आहे. लँडरच्या हॉरिझोंटल कॅमेऱ्याने हा फोटो घेतला आहे. इस्त्रोने हेच फोटो सर्व भारतीयांसोबत ट्विटद्वारे शेअर केले आहेत.

चंद्राच्या दक्षिण ध्रूवावरील फोटो

फोटोंचा शास्त्रज्ञांना उपयोग कसा?

“चांद्रयाण उतरताना लँडरमधील हॉरिझोंटल कॅमेऱ्याने हे फोटो घेतले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील असंख्य फोटो लँडरने घेतले आहेत. हे फोटो हाय क्वालिटीचे आहेत. यापेक्षा चांगल्या दर्जाचे फोटो लँडरकडून मिळतील. आपल्याला रोवरकडून फोटो प्राप्त होतील. या फोटोंचा फायदा शास्त्रज्ञांना प्रयोग करताना होईल. चंद्राची जडणघडण कशी आहे. चंद्र कोणत्या खडकाने बनला आहे? चंद्रात कोणते मिनरल्स आहेत? या सर्वांचं विश्लेषण हे या फोटोंच्या मदतीने करता येईल. तसेच चांगलेचांगले शोध लागण्याची शक्यता आहे”, अशी माहिती खगोल अभ्यासह सुरेश चोपणे यांनी दिली.