AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

chandrayaan 3 update | उद्या चंद्रावर चमत्कार होणार? मिशन चांद्रयानसाठी पुढचे काही तास महत्त्वाचे

chandrayaan 3 update | मिशनसाठी 22 सप्टेंबरचा दिवस का महत्त्वाचा आहे? मिशन चांद्रयानमध्ये उद्या एक नवीन टप्पा येऊ शकतो. इस्रोचे वैज्ञानिक नक्कीच हा प्रयोग करतील. चंद्रावर इस्रोचे सर्व प्रयोग यशस्वी ठरले आहेत.

chandrayaan 3 update | उद्या चंद्रावर चमत्कार होणार? मिशन चांद्रयानसाठी पुढचे काही तास महत्त्वाचे
chandrayaan 3 Vikram lander
| Updated on: Sep 21, 2023 | 12:07 PM
Share

बंगळुरु : चंद्रावर पुन्हा एकदा हालचाल वाढणार आहे. चंद्रावर सूर्योदय होणार आहे. विक्रम लँडर ज्या ठिकाणी आहे, त्या शिवशक्ती पॉइंटवर सूर्यप्रकाश येणार आहे. लँडिंगनंतर 11 दिवसांनी विक्रम लँडर आणि प्रज्ञा रोव्हरला स्लीप मोडमध्ये टाकण्यात आलं होतं. चंद्रावर दोघेही बाजू-बाजूला आहेत. 22 सप्टेंबरला शिवशक्ती पॉइंटवर सूर्यप्रकाश येईल. सूर्योदयानंतर विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा सक्रीय होऊ शकतात. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर बरोबर पुन्हा एकदा कम्युनिकेशन स्थापित करण्याचा प्रयत्न होईल. चांद्रयान-3 साठी पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत. शिवशक्ती पॉइंटवर लवकरच सूर्योदय होईल, असं एक्सवर बुधवारी इस्रोकडून सांगण्यात आलं. विक्रम आणि प्रज्ञानला सूर्यप्रकाश मिळेल. ही दोन्ही उपकरण पुन्हा चालू होतील अशी अपेक्षा आहे.

रोव्हर आणि लँडरला अशा पद्धतीने ठेवण्यात आलय की, सूर्योदय झाल्यानंतर सूर्यप्रकाश थेट पॅनलवर येईल. चांद्रयान-3 मिशनतंर्गत चंद्रावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला पाठवण्यात आलय. लँडर आणि रोव्हरच्या माध्यमातून चंद्रावर अनेक प्रयोग करण्यात आले. आता 22 सप्टेंबरला विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा सक्रीय होतील अशी आशा आहे. आपण फक्त अपेक्षा करु शकतो, दोन्ही पुन्हा सक्रीय होऊन काम सुरु करतील असं इस्रो प्रमुख सोमनाथ म्हणाले. चांद्रयान-3 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर उतरलं. अशी कामगिरी करुन भारताने नवीन इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला. उद्याची उत्सुक्ता का?

चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर उपकरणांची निर्मिती 14 दिवस सूर्यप्रकाशात काम करतील अशा पद्धतीने करण्यात आली आहे. चंद्रावर रात्रीच्यावेळी मायनस 200 तापमान असतं. या वातावरणात उपकरण गोठून जातील. त्यामुळे उद्या विक्रम आणि प्रज्ञान काम सुरु करतील का? याची उत्सुक्ता आहे. पृथ्वीवरच 14 दिवस म्हणजे चंद्रावरचा एक दिवस असतो. तिथे 14 दिवस सूर्यप्रकाश, 14 दिवस रात्र असते. इस्रोसाठी काही अशक्य नाहीय. लँडर आणि रोव्हरला स्लीप मोडमध्ये टाकण्याआधी इस्रोने होप चाचणी यशस्वी केली होती. म्हणजे लँडरच दुसऱ्यांदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झालं होतं.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.