AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2047 पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याचे प्रयत्न, हिंदू मुलीचं बळजबरी धर्मांतर आणि निकाह, संतापजनक सत्य समोर

5 वर्ष मुलीची फसवणूक, बळजबरी धर्मांतर आणि निकाह, 2047 पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याचे प्रयत्न, त्यासाठी मोठं रॅकेट... संतापजनक सत्य अखेर समोर... सध्या सर्वत्र घडलेल्या घटनेची चर्चा...

2047 पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याचे प्रयत्न, हिंदू मुलीचं बळजबरी धर्मांतर आणि निकाह, संतापजनक सत्य  समोर
फाईल फोटो
| Updated on: Jul 14, 2025 | 10:10 AM
Share

हिंदू मुलीचं इस्लाममध्ये बळजबरी धर्मांतर केलं त्यानंतर लग्न केलं… असं त्या एका मुलीसोबत नाही तर, असं अनेक मुलीसोबत झाल्याची घटना नुकताच समोर आली आहे. जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा याच्या अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. बाबाचे काळे कृत्य हळूहळू जगासमोर येत आहेत. काळ्या जादूसोबतच, छांगूर बाबावर अनेक गंभीर आरोप लावले जात आहेत, ज्यात हिंदू मुलींचे धर्मांतर त्यांचे निकाह असे अनेक आरोप करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ओरैया जिल्ह्यातील अजितमलजवळ राहणाऱ्या एका मुलीनेही छांगूर बाबावर गंभीर आरोप केले. मुलीचं बळजबरी इस्लाममध्ये धर्मांतर केलं आणि तिचं लग्न देखील एका मुस्लिम मुलासोबत बाबाने लावून दिलं. शिवाय छांगूर बाबा 2047 पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याची चर्चा त्याच्या टोळीसोबत करत होता… असा आरोप देखील मुलीने केला आहे.

मुलीने सांगितल्यानुसार, तिच्या आईची ओळख एका रुद्र शर्मा नावाच्या मुलासोबत झाली होती. रुद्रने मुलीच्या आईला विश्वासात घेतलं आणि सांगितलं, छांगूर बाबा मदत करतील आणि तुमच्या पतीचं दारुचं व्यसन दूर होईल. त्यानंतर 2019 मध्ये आम्ही छांगूर बाबाला भेटायला लखनऊ येथे गेलो. छांगूर बाबाने आम्हाला ताबीज दिला आणि म्हणाला रुद्र माझा अनुयायी आहे तुम्ही देखील व्हा….

मुलीने सांगितलं, रुद्र शर्मा याचं खरं नाव मेराज अंसारी होतं आणि त्याच्या दोन बहिणी देखील माझ्याकडे यायच्या. स्वतःची खरी ओळख लपवून ते आमच्या घरी 5 वर्ष येत – जात होते. मेराज याच्याकडे रुद्र शर्मा नावाचा आधार कार्ड देखील होता. पुढे मुलगी म्हणाली, ‘2024 मध्ये रुद्र माझ्या घरी आला आणि म्हणाला कानपूरमध्ये छांगूर बाबा आहेत त्यांना आधी भेटू… पण तो मला फतेहपूर येथील एका मशिदीत घेऊन गेला आणि तिथे त्याने माझ्यासोबत बळजबरी लग्न केलं. तेव्हा मला कळलं त्याचं खरं नाव मेराज अंसारी असं आहे. छांगूर बाबांनी मशिदीतच व्हिडिओ कॉलद्वारे माझं नाव जेनम ठेवलं. त्यानंतर मुलीला 3 महिने घरात कैद करण्यात आल्याचं देखील मुलीने सांगितले.’

एवढंच नाही तर, पुढे मुलगी म्हणाली, ‘मशिदीत सबा नावाची एक महिला होती, तिला माझी खोटी आई बनवण्यात आली होती. तिला एक भाऊ, एक वडील आणि एक आई होती. ते दररोज छांगूर बाबांशी बोलत असत आणि 2047 पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याबद्दल बोलत असायचे… असं देखील मुलगी म्हणाली.

मेराजच्या डोक्यात रॉड मारून हत्या

3 महिन्यानंतर मुलगीने छांगूर बाबाच्या तावडीतून स्वतःची सुटका केली आणि स्वतःच्या घरी आली. मेराज जेथील तिच्या पाठी मुलीच्या वडिलांच्या घरी आला. मुलगी म्हणाली, ‘माझ्या घरी आल्यानंतर त्याने माझे अश्लील व्हिडीओ माझ्या वडिलांना दाखवले आणि माझ्या लहान बहिणीसोबत लग्न केल्यानंतर सर्व व्हिडीओ डिलिट करेल असं म्हणाला. अशात माझ्या वडिलांना राग आला आणि त्यांनी मेराजच्या डोक्यावर रॉडने हल्ला केला. त्यामध्ये मेराज याची हत्या झाली. त्यानंतर माझ्या आई – वडिलांना पोलिसांनी अटक केली.’

मुलगी म्हणाली, ‘मेराजच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेलो होते. पण पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही. त्यानंतर आम्ही लखनऊ येथे एफआयआर दाखल करण्यासाठी गेलो. तेव्हा पोलिसांनी आमची तक्रार लिहून घेतली. त्यानंतर कोर्टात माझा जबाब देखील नोंदवण्यात आला. पण आरोपींवर कारवाई झालेली नाही.’

मुलीने सांगितले की अजूनही अनेक मुली त्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यापैकी एक कानपूरचीच आहे. हे लोक तिच्या घरी येऊन तिचं ब्रेनवॉश करतात.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.