
जगामध्ये सर्वसामान्यपणे भारतीय रुपयांची तुलना ही डॉलर किंवा यूरोसोबत केली जाते, त्यामुळे भारतीय रुपया या दोन्ही चलनाच्या तुलनेत खूपच कमजोर दिसतो. मात्र जगात असे देखील काही देश आहेत, ज्या देशांच्या चलनाचं मूल्य हे भारतीय रुपयाच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे तुम्ही जर अशा देशांमध्ये फिरण्यासाठी गेलात तर तुमच्याकडे कमी असलेले पैसे देखील या देशांमध्ये खूप वाटतात, तुम्ही आरामात अगदी कमी पैशांमध्ये हे देश फिरू शकता, या देशांमध्ये पर्यटनाचा आनंद घेऊ शकता, आर्थिक परिस्थिती, राजकीय अस्थिरता, वाढत जाणारी लोकसंख्या, महागाई अशा अनेक कारणांमुळे या देशांच्या चलनाच्या मुल्यामध्ये मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळतं, आज आपण अशाच काही देशांची माहिती जाणून घेणार आहोत. सोबतच या देशामध्ये भारतीय रुपयाची किंमत किती होते? ते देखील पहाणार आहोत.
व्हियतनाम – डोंग हे व्हियतनामचे अधिकृत चलन आहे, मात्र डोंग हे रुपयाच्या तुलनेत खूपच कमजोर आहे. व्हिएतनाममध्ये भारताचा एक रुपया 297 डोंग बरोबर आहे, म्हणजे तिथे तुम्हाला एक रुपयाच्या बदल्यात 297 डोंग मिळू शकतात. त्यामुळे इथे फिरण्याच्या राहण्याचा तुमचा खर्च खूप कमी होतो, सर्व वस्तू तुम्हाला खूप स्वस्त वाटतात. तुम्ही अगदी काही रुपयांमध्ये संपूर्ण व्हिएतनाम फिरू शकता.
इंडोनेशिया – इंडोनेशियामध्ये भारताच्या एका रुपयाची किंमत तब्बल 188 रुपये एवढी आहे. त्यामुळे या देशात फिरण्यासाठी, राहण्यासाठी खाण्यासाठी येणारा खर्च हा खूप कमी आहे. तुम्ही कमी खर्चात पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.
लाओस – लाओसमध्ये भारताच्या एका रुपयाची किंमत 244 रुपयांच्या बरोबर आहे, त्यामुळे तुम्ही अगदी स्वस्तात पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.
कंबोडिया – कंबोडियामध्ये भारताच्या एक रुपयाची किंमत 45 रुपयांच्या आसपास आहे, तुम्हाला तिथे एक रुपयाच्या बदल्यात 45 रुपये मिळू शकतात. कंबोडियामध्ये पर्यटनासाठी अनेक सूंदर ठिकाणी आहेत, जिथे तुम्ही भेट देऊ शकता, कंबोडियामध्ये राहण्याचा आणि खाण्याचा खर्च खूपच कमी आहे. तुम्ही आराताम या ठिकाणी पर्यटन करू शकता.