‘मुली आपल्या इच्छेनुसार प्रेमसंबंध बनवतात, नंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करतात’, छत्तीसगडच्या महिला आयोग अध्यक्षांचा दावा

| Updated on: Dec 11, 2020 | 9:09 PM

छत्तीसगडच्या महिला आयोग अध्यक्षा किरणमयी नायक (Chhattisgarh state women commission Chairperson Kiranmayi Nayak) यांनी लव्ह जिहादवर भाष्य केलं

मुली आपल्या इच्छेनुसार प्रेमसंबंध बनवतात, नंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करतात, छत्तीसगडच्या महिला आयोग अध्यक्षांचा दावा
Follow us on

रायपूर : छत्तीसगडच्या महिला आयोग अध्यक्षा किरणमयी नायक (Chhattisgarh state women commission Chairperson Kiranmayi Nayak) यांनी लव्ह जिहादवर भाष्य केलं आहे. “महिला आपल्या मर्जीने प्रेमसंबंध बनवतात, नंतर बलात्कार सारखा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल करतात. महिलांनी प्रेमसंबंध करताना काळजी घ्यावी. समोरची व्यक्ती चांगली आहे की वाईट याची शाहनिशा करुन घ्यावी. चुकीच्या लोकांशी रिलेशनशिप ठेवल्याचे परिणाम वाईट होतात”, असं नायक म्हणाल्या. महिलांनी लव्ह जिहाद पासून सावध राहिलं पाहिजे, असंदेखील मत त्यांनी मांडलं.

“मुलींना स्वत:ला समजायला हवं की, एखादा विवाहित पुरुष प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना आनंदी ठेवूच शकत नाही. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मुलींना पोलिसांकडे जावच लागतं. अशा अनेक घटनांमध्ये बऱ्याचदा मुली आपल्या इच्छेनुसार प्रेमसंबंध बनवतात आणि लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर जेव्हा समोरची व्यक्ती धोका देतो तेव्हा मुली बलात्काचा गुन्हा दाखल करतात”, असं किरणमयी नायक (Chhattisgarh state women commission Chairperson Kiranmayi Nayak) म्हणाल्या.

“आजकाल मुली 18 वर्षाच्या वयातच लग्न करतात आणि आई बनतात. त्यानंतर मग महिला आयोगाकडे तक्रार घेऊन येतात. मुलींनी आधी शिक्षण पूर्ण करुन जबाबदार बनलं पाहिजे. त्यानंतर ज्याच्याशी लग्न करणार ती व्यक्तीदेखील जबाबदारी सांभाळणारी असेल, याची शाहानिशा करुन घ्यावी”, असं आवाहन किरणमयी नायक यांनी केलं.

लव्ह जिहादविरोधात उत्तर प्रदेशमध्ये कडक कायदा

लव्ह जिहादविरोधात कडक कायदा करण्यात आला आहे. या कायद्यान्वे आरोपीस दहा वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या कायद्यानुसार आता आंतरधर्मीय विवाहासाठी 2 महिन्यांची नोटीस द्यावी लागणार आहे. तसेच जिल्हा दंडाधिकाऱ्यांची परवानगी देखील घ्यावी लागणार आहे. जर कोणत्याही तरुणाने आपलं नाव लपवून लग्न केलं तर त्याला 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

संबंधित बातमी : योगी सरकारकडून लव्ह जिहादविरोधात अध्यादेश जारी, दोषींना 10 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद