AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महापालिका निवडणुकीचे निकाल लागताच काँग्रेसमध्ये उभी फूट? राजकीय वर्तुळात खळबळ

महापालिका निवडणुकीमध्ये यावेळी काँग्रेसने चांगली कामगिरी केली, राज्यात तिसऱ्या क्रमाकांचा मोठा पक्ष ठरला, मात्र आता काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर आली असून, पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! महापालिका निवडणुकीचे निकाल लागताच काँग्रेसमध्ये उभी फूट? राजकीय वर्तुळात खळबळ
congressImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 23, 2026 | 9:13 PM
Share

काही दिवसांपूर्वीच राज्यात महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं, भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला, राज्यातील काही महापालिकांमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता आली, तर काही महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीची सत्ता आली, तर दुसरीकडे भाजपनंतर राज्यात शिवसेना शिंदे गटाला यश मिळालं. या निवडणुकीच्या निकालांमध्ये शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष ठरला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षाला या महापालिका निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. महापालिका निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेस हा तिसऱ्या क्रमाकांचा पक्ष ठरला आहे. दोन्ही राष्ट्रवादी, राष्ट्रवादी अजित पवार गट  आणि राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच शिवसेना ठाकरे गट व मनसे यांना या निवडणुकीत मोठा दणका बसला.

दरम्यान महापालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं, काँग्रेस हा राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. मात्र महापालिका निवडणुकीनंतर आता काँग्रेसमध्ये फूट पडताना दिसून येत आहे, चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमध्ये उभी फूट  पडण्याची शक्यता आहे. 13  नगरसेवकांना घेऊन खासदार प्रतिभा  धानोरकर या नागपूर विभागीय कार्यालयात पोहोचल्या आहेत. चंद्रपूर महापालिकेसाठी प्रतिभा धानोरकर या वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यामधील वाद आता समोर आला आहे. यापूर्वी देखील विजय वडेट्टीवार हे नगरसेवक घेऊन गेल्याचा आरोप धानोरकर यांनी केला होता. यावर स्पष्टीकरण देताना आमच्यामध्ये संवाद झाला असून, आता कोणताही वाद नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.

मात्र अजूनही हा वाद मिटला नसल्याचं दिसून येत आहे, आता काँग्रेसचे 13 नगरसेवक घेऊन धानोरकर थेट नागपूर विभागीय कार्यालयात पोहोचल्या आहेत, त्या  चंद्रपूर महापालिकेसाठी नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. दरम्यान यावर आता काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान