AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेट मुख्यमंत्र्यांना अटक करणारी वाघीण, 20 वर्षांमध्ये 40 बदल्या, तुकाराम मुंढेंपेक्षाही या महिला पोलीस अधिकारी चर्चेत

एफडीएचा पदभार स्विकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी राज्यात कामाचा धडका लावला आहे, त्यांच्या कार्याचं कौतुक होत आहे. मात्र सध्या तुकाराम मुंढे यांच्यापेक्षाही जास्त चर्चा एका आयपीएस ऑफिसरची होत आहे.

थेट मुख्यमंत्र्यांना अटक करणारी वाघीण, 20 वर्षांमध्ये 40 बदल्या, तुकाराम मुंढेंपेक्षाही या महिला पोलीस अधिकारी चर्चेत
Rupa MaudgilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 14, 2026 | 11:47 AM
Share

तुकाराम मुढे यांनी  FDA  अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर राज्यभरात कामचा धडका लावला आहे. त्यांच्या कामाचं राज्यभरातून कौतुक होत आहे. अधिकारी असावा तर तो तुकाराम मुंढे यांच्या सारखा अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून येत असल्याचं दिसून येत आहे. मुंढे हे आणखी एका कारणासाठी राज्यभरात चर्चेत आहेत, ते म्हणजे त्यांच्या 21 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्तीमध्ये मुंढे यांची तब्बल 25 वेळा बदली झाली आहे. त्यांनी आतापार्यंत ज्या -ज्या विभागाचा पदभार स्विकारला आहे, त्या प्रत्येक विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या नावाची कायमच चर्चा सुरू असते.

परंतु सध्या तुकाराम मुंढे यांच्यापेक्षाही एका महिला आयपीएस अधिकाऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. रूपा मौदगिल असं या आयपीएस महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. तुकाराम मुंढे यांच्या तरी 21 वर्षांमध्ये 25 बदल्या झाल्या आहेत. मात्र रूपा मौदगिल यांच्या वीस वर्षांमध्ये तब्बल 40 वेळा बदली झाली आहे. त्या एक ठिकाणी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ राहू शकल्या नाहीत. देशभरात त्यांच्या कार्यपद्धतीची चर्चा सुरू आहे. त्यांनी त्यावेळी थेट मध्य प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना देखील अटक केली होती.  गेल्या वीस वर्षांमध्ये त्यांच्या चाळीस बदल्या झाल्या, मात्र जिथे बदली झाली, तिथे त्यांनी आपल्या कामाचा धडका कायम ठेवला, गुन्हेगारांमध्ये चांगलाच वचक बसवला. त्यामुळे त्यांच्या कार्याचं आज कौतुक होत आहे.

कोण आहेत रूपा मौदगिल? 

रुपा मौदगिल या कर्नाटक कॅडरच्या वर्ष 2000 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.  त्या आपल्या कामाच्या पद्धतीमुळे कायमच चर्चेत राहिल्या आहेत, अनेकदा त्यामुळे मोठा वाद देखील निर्माण झाला. त्यांनी गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार याविरोधात अतिशय कडक भूमिका घेतली आहे. त्यांच्या वीस वर्षांच्या काळात त्यांची तब्बल चाळीस वेळा बदली झाली आहे. मात्र त्या जिथे गेल्या तिथे त्यांनी कामाची शैली न बदलता त्याच पद्धतीने काम सुरू ठेवलं.  देशभरात त्या प्रसिद्ध आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?