
अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर अमेरिका आणि भारतामधील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारताची चीन आणि रशियासोबतची जवळीक वाढताना दिसत आहे. चीन आणि रशियासोबत वाढत असलेली भारताची जवळीक अमेरिकेसाठी डोकेदुखीचा विषय ठरली आहे, त्यामुळे अमेरिकेकडून कुरापती सुरूच आहेत. अमेरिकेने मध्यंतरी चीनवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, त्यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये आता उघड-उघड संघर्ष पहायला मिळत आहे. अमेरिकेनं आपल्या नॅशनल सिक्युरिटी अहवालामध्ये चीन आपला नंबर एकचा शत्रू असल्याचं म्हटलं होतं, तर भारताचा समावेश हा महत्त्वाच्या भागीदार देशांमध्ये केला होता. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर चीनने देखील अमेरिकेला चांगलाच दणका दिला होता. चीन अमेरिकेमध्ये उत्पादीत होणाऱ्या सोयबीनचा सर्वात मोठा खरेदीदार देश होता, मात्र चीनने त्यानंतर अमेरिकेकडून येणाऱ्या सोयाबीनची आयात बंद केल्यानं तेथील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान हे व्यापार युद्ध सुरू असतानाच आता चीनने मोठा निर्णय घेतला आहे, त्यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे.
चीनच्या आर्मीने भविष्यातील युद्ध मोहीमा लक्षात घेऊन आता आपली DF-27 मिसाईल तैनात केली आहे. चीनची DF-27 मिसाईल ही जगातील सर्वात शक्तिशाली मिसाईल आहे. ही एक इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल असून, या मिसाईलच्या माऱ्याची क्षमता प्रचंड आहे. जर समजा भविष्यात युद्ध झालाचं तर या मिसाईलपासून चीनच्या शेजारील देशांनाच नाही तर अमेरिकेला देखील मोठा धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे अमेरिकेचं टेन्शन वाढलं आहे. या मिसाईलमुळे आता थेट अमेरिकेवर मारा करता येणार आहे.
यूरेशियन टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून 23 डिसेंबरला चीनचे सैन्य आणि सुरक्षा व्यवस्था याबाबत एक रिपोर्ट जारी करण्यात आला आहे, त्यामध्ये चीनने DF-27 मिसाईल तैनात केली असल्याचा दावा करण्यात आला आहे. DF-27 मिसाईल तैनात करण्यात आल्यानं अमेरिकेमध्ये खळबळ उडाली आहे, अमिरिका आता चीनच्या टप्प्यात आला आहे. अमेरिकेची चिंता वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे सध्या चीनचा तैवान आणि जपानसोबत संघर्ष चालू आहे, जपान हा अमेरिकेचा मित्र आहे, तर अनेकदा अमेरिकेकडून तैवानला देखील मोठी मदत करण्यात आली आहे, अशा स्थितीमध्ये जर युद्ध झालं तर या मिसाईलच्या माध्यमातून थेट अमेरिकेवर हल्ला होऊ शकतो.