AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने बनवला असा फायटर जेट, चीन-पाकिस्तानच नव्हे तर अमेरिकाही टेन्शनमध्ये

तेजस MK-1A मध्ये प्रगत मिशन संगणक आहे. तसेच उच्च कार्यक्षमता क्षमता डिजिटल फ्लाइट कंट्रोल कॉम्प्युटर (DFCC Mk-1A), स्मार्ट मल्टी-फंक्शन डिस्प्ले (SMFD), प्रगत इलेक्ट्रॉनिकली स्कॅन केलेले ॲरे (AESA) रडार, प्रगत स्व-संरक्षण जॅमर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आहेत.

भारताने बनवला असा फायटर जेट, चीन-पाकिस्तानच नव्हे तर अमेरिकाही टेन्शनमध्ये
Tejas Fighter Jet
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 29, 2025 | 11:23 AM
Share

Tejas Fighter Jet: भारत लष्कर गेल्या काही वर्षांत चांगलेच मजबूत झाले आहेत. त्यातच भारताने ‘मेक इन इंडिया’वर अंमलबजावणी लष्करी उत्पादनात सुरु केली आहे. आता लष्कारात विदेशी उत्पादनांचा वापर कमी केला जात आहे. त्यासाठी भारतातील खासगी क्षेत्रालाही लष्करी सामग्रीचे उत्पादन करण्यास परवानगी दिली आहे. भारत युद्धनौका आणि फायटर जेटचे उत्पादन करत आहेत. त्याचा धसका चीन आणि पाकिस्तान या राष्ट्रांनी घेतला आहे. परंतु भारताच्या फायटर जेटचा धसका सुपरपॉवर अमेरिकेनेही घेतला आहे. अमेरिकासुद्धा टेन्शनमध्ये आला आहे. जगातील महाशक्तीला भारताचे लष्करी क्षेत्र मागे टाकण्याची भीती वाटू लागली आहे.

अमेरिकेकडून उशीर, हा शोधला पर्याय

भारताने तेजस MK 1A फायटर जेटसाठी अमेरिकेच्या F404 इंजिनासाठी डील केली होती. त्यानुसार मार्च 2024 मध्ये सहा इंजिन भारताला मिळणार होते. परंतु अमेरिकन फर्म GE एअरोस्पेसकडून अजूनही भारताला इंजिन मिळाले नाही. त्यांनी डिलीव्हरची मुदत वाढवून मार्च 2025 केली. अमेरिकेकडून सातत्याने या इंजिनाच्या डिलीव्हरीत उशीर होत आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सध्या हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड तेजस MK 1A च्या आरक्षित इंजिनासोबत एअरफोर्सला सप्लाय करु शकते. त्यानंतरत जेव्हा अमेरिकन फर्म GE एअरोस्पेसचे इंजिनाची डिलीव्हरी होईल त्यानंतर इंजिन F404 मध्ये बदलले जाणार आहेत. तेजसचे पहिले MK 1A लढाऊ विमान 31 मार्च 2024 रोजी हवाई दलाकडे सुपूर्द केले जाणार होते. परंतु इंजिन वेळेवर न मिळाल्याने ते लांबले. अमेरिकेची जीई कंपनी 2023-24 या आर्थिक वर्षात एचएएलला सहा इंजिने देणार होती.

अमेरिकेस काय वाटतेय भीती?

अमेरिकेच्या F-16 विमानांना आधीपासूनच चीनच्या JF-17 लढाऊ विमानापासून स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. त्यानंतर आता भारताचे तेजस MK 1A हे या दोघांपेक्षा जास्त हायटेक फायटर जेट आहे. त्यामुळेच अमेरिकेला भीती वाटत आहे. लष्करी सामग्रीच्या बाजारात भारताच्या फायटरने प्रवेश केल्यानंतर स्पर्धा आणखी वाढेल आणि F-16 च्या विक्रीवर परिणाम होईल. पाकिस्तानसुद्धा अमेरिकेकडून F-16 विमाने घेत असतो.

तेजसचे वैशिट्ये काय, काय…

तेजस MK-1A मध्ये प्रगत मिशन संगणक आहे. तसेच उच्च कार्यक्षमता क्षमता डिजिटल फ्लाइट कंट्रोल कॉम्प्युटर (DFCC Mk-1A), स्मार्ट मल्टी-फंक्शन डिस्प्ले (SMFD), प्रगत इलेक्ट्रॉनिकली स्कॅन केलेले ॲरे (AESA) रडार, प्रगत स्व-संरक्षण जॅमर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आहेत. भारताचा हे लढाऊ विमान तेजस एमके-1 सारखे आहे. परंतु त्यात इलेक्ट्रॉनिक वारफेयर सूईट, उत्तम AESA राडार, सेल्फ प्रोटेक्शन जॅमर, राडार वॉर्निंग रिसीवर आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...