मोठा हाहाकार! चीनी लष्करी विमान थेट घुसले भारतीय हद्दीत, ज्याची भीती तेच झालं, 25 मिनिटे..
चीनची मुजोरी वाढत आहे. त्यातच भारताच्या नाकावर टिच्चून एक चीनी विमान भारतीय हद्दीत घुसले. धक्कादायक बाब म्हणजे भारताने अनेकदा इशारा देऊनही भारतीय हद्दीत 25 मिनिटांपेक्षा अधिक काळ हे विमान थांबले होते. अत्यंत संवेदनशील भागात हे विमान गिरट्या मारत होते.

सीमेवर चीनची दादागिरी वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दावा केला जात आहे की, चीन हा भारतीय हद्दीत घुसखोरी करत आहे. यादरम्यान काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाली. चीन आणि भारत सीमेवर चीनच्या घुसखोरीने तणाव असतानाच आता धक्कादायक बातमी पुढे येत आहे. चीनने आता हद्दच पार केल्याचे बघायला मिळत आहे. चीनचे एक लष्करी विमान सिक्कीममधील भारतीय हवाई क्षेत्रात शिरले. फक्त भारतीय हवाई हद्दीतच नाही तर हे विमान तिथे जवळपास 20 ते 25 मिनिटे थांबल्याचीही माहिती आहे. भारतीय हवाई दलाला सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सुमारे 25000 फूट उंचीवर हे विमान दिसून आले. भारतीय हवाई दलाने चीनच्या लष्करी विमानाला रेडिओद्वारे वारंवार चेतावणी दिली. काही वेळ थांबल्यानंतर हे विमान परतल्याचे कळत आहे. मात्र, याने एकच खळबळ उडाली.
भारतीय लष्काराने चीनच्या या लष्करी विमानाला चेतावणी देऊनही काही काळ हे विमान तिथेच थांबले. या परिसरातील धोरणात्मक महत्व लक्षात घेता आता भारताची चिंता वाढली आहे. कारण हा भाग सिलीगुडी कॉरिडॉरच्या वरच्या बाजूचा आहे. जो भारताच्या ईशान्येकडील राज्यांना देशाच्या उर्वरित भागाशी जोडणारा अत्यंत महत्वाचा भूभाग आहे.
भारतीय हवाई दलाने 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास चिनी लष्करी विमान शोधून काढले. चीनी विमानाचे लोकशन भारतीय लष्कराला सापडले. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान सुमारे 25000 फूट उंचीवरून उडत होते. विमान भारतीय हद्दीत सुमारे 20 ते 25 मिनिटे एकाच भागात घिरट्या घालत होते. भारतीय हवाई दलाने विमानाला चीनी हद्दीत परतण्यास सांगितले.
भारताने अनेकदा इशारा देऊनही काही वेळ हे विमान भारतीय हद्दीतच होते. रेडिओच्या माध्यमातून भारताने चीनी विमानाला इशारा दिला. मात्र, इशारे मिळूनही हे विमान त्या भागात काही वेळ थांबले. विमानाचा नेमका मार्ग ते रवाना झाल्याच्या परिस्थितीशी संबंधित तपशील आणि त्याच्या हालचालींचे स्वरूप अद्याप उघड करण्यात आलेले नाही. मात्र, ही घटना भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
