CJP Abhijeet Dipke: कॉकरोचमध्ये फुट? सीजेपीच्या फुटीच्या चर्चांवर अभिजीत दिपके यांची पोस्ट व्हायरल
CJP Abhijee Dipke Ashutosh Ranka Saurav Das : काँकरोच जनता पार्टीचे संस्थापक आणि संयोजक अभिजीत दिपके यांची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. सीजेपीमध्ये फुट पडल्याच्या कथित दाव्यानंतर त्यांच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

CJP Abhijeet Dipke Social Media Viral Post : कॉकरोच जनता पार्टीत फुट पडल्याचा दावा करण्यात येत आहे. याविषयीच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. त्यानंतर पक्षाचे संस्थापक आणि संयोजत अभिजीत दिपके यांच्या एका पोस्टची चर्चा होत आहे. जंतरमंतरवील आंदोलनानंतर सहसंयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका यांना तिहार तुरूंगात काही दिवस काढावे लागले. अभिजीत दिपके यांना तुरूंगवास सहन करावा लागला नाही. आंदोलनाचा निर्णय त्यांचा होता. पक्षातील निर्णय दोघे घेतात. आपण केवळ त्यांचे आदेश मानतो असे दिपके म्हणाल्याच्या चर्चा रंगल्या. दिपके यांनी मित्रांना संकटात ढकलले. तीनही नेत्यांमध्ये आता पूर्वीसारखं बॉडिंग राहिलेले नाही. त्यांची मैत्री पूर्वीसारखी घट्ट नाही. पक्षात फूट पडल्याचा दावा करण्यात येत होता. या सर्व चर्चाना अभिजीत दिपके यांनी भन्नाट उत्तर दिले आहे.
अभिजीत दिपके यांची पोस्ट चर्चेत
या सर्व चर्चा आणि दाव्यांना अभिजीत दिपके यांनी पूर्णविराम दिला. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. एक्सवर त्यांनी एक मजेशीर फोटो शेअर करत अशा अफवा पसरवणाऱ्यांना भन्नाट उत्तर दिले आहे. पक्षातंर्गत वाद आणि फुटीचे चित्र असल्याचा दावा करणाऱ्या युझर्सना उत्तर देण्यासाठी दिपके यांनी हा खास फोटो शेअर केला आहे.
या फोटोत अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका दिसत आहेत. त्यांनी हा भन्नाट फोटो अपलोड केला आहे. त्यात या तीनही नेत्यांनी एकसारखा म्हणजे काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला आहे. फोटोत दिपके स्वतः सेल्फी काढताना दिसत आहेत. तर आशुतोष रांका आणि सौरव दास हे त्यांना बुक्का मारण्याच्या अविर्भावात आहेत. या फोटोला अभिजीत दिपके यांनी भन्नाट कॅप्शन दिली आहे. त्यांनी पक्षातंर्गत फूट (Internal Rift) असे कॅप्शन लिहित संभ्रम तयार करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सीजेपीचा हा उपरोधिक टोला आहे.
सुटकेनंतर तीनही नेते एकत्र
सुटकेसाठी आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी त्यांना गेल्या आठवड्यात वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. दोन्ही नेते तिहार तुरूंगातून बाहेर आले. पण त्यापूर्वीच काही जणांनी समाज माध्यमांवर या तीनही नेत्यात आता सामंजस्य राहिलेले नाही. त्यांच्यात समन्वय दिसत नाही, अशा पोस्ट केल्या होत्या. या सर्व चर्चा या फोटोने फेटाळल्या आहेत. अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास या तीनही नेत्यांनी एकत्रित येत मिश्किल अंदाजात विरोधकांना उत्तर दिले आहे.